• Download App
    प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भारतात आत्मघाती हल्ल्याची अल कायदाची धमकी, हिटलिस्टवर दिल्ली-मुंबई, यूपी आणि गुजरात|Al Qaeda threatens suicide attack in India over remarks made on Prophet Mohammad, Delhi-Mumbai, UP and Gujarat on Hitlist

    प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भारतात आत्मघाती हल्ल्याची अल कायदाची धमकी, हिटलिस्टवर दिल्ली-मुंबई, यूपी आणि गुजरात

    वृत्तसंस्था

    मुंबई : अल-कायदा या दहशतवादी संघटनेने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या सन्मानासाठी लढणार असल्याचे अल कायदाने म्हटले आहे.Al Qaeda threatens suicide attack in India over remarks made on Prophet Mohammad, Delhi-Mumbai, UP and Gujarat on Hitlist

    अल कायदाच्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना ठार मारू. आमच्या अंगावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधून पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना आम्ही उडवून लावू. अपमान करणाऱ्यांनी दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आपला अंत होण्याची वाट पाहावी.”



    भारतीय उपमहाद्वीपातील अल कायदाने (AQIS) भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. AQIS या दहशतवादी संघटनेने प्रसारमाध्यमांना पत्र जारी करून भारतातील हिंदूंना मारण्याचा इशारा दिला आहे. आत्मघातकी हल्ल्यात पैगंबरांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात बोलणाऱ्या जगातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही मारून टाकू, असे या पत्रात लिहिले आहे. त्याच वेळी, त्यांनी स्वतःला पैगंबरांच्या प्रतिष्ठेसाठी एक सेनानी असल्याचे सांगितले आहे.

    भाजपच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्याचा पत्रात उल्लेख

    पत्रात लिहिले आहे की, ‘आम्ही इतरांना आमच्या पैगंबरांच्या सन्मानासाठी लढण्यासाठी आणि मरण्यासाठी उद्युक्त करू, आमच्या पैगंबराचा अपमान करणार्‍यांना आम्ही ठार करू आणि आम्ही आमच्या आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू, जेणेकरून जे आमच्या पैगंबरांचा अपमान करण्याचे धाडस करतील त्यांना उडवले जाईल.” या पत्रात ‘भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आपल्या अंताची वाट पाहावी’ असे स्पष्टपणे लिहिले आहे.

    या पत्रात भारतीय मीडियाच्या टीव्ही चॅनेल्समधील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्यांनी पैगंबरावर केलेल्या टीकेचा स्पष्ट उल्लेख आहे. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या या पत्राची सुरक्षा यंत्रणा आता चौकशी करत असून हे पत्र सोशल मीडियावर कोणी अपलोड केले आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    Al Qaeda threatens suicide attack in India over remarks made on Prophet Mohammad, Delhi-Mumbai, UP and Gujarat on Hitlist

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!