प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.Akshay Kumar – Twinkle Khanna’s helping hand, 100 oxygen concentrators to donate
विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर करत लिहिले, ‘लंडनच्या दोन डॉक्टर्सनी 120 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी आणि अक्षयने 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे एकूण 220 कंसन्ट्रेटरचं दान केले जाणार आहे. एकत्र येऊन योगदान करुयात.’
ट्विंकल खन्नाने त्याआधी एका पोस्टमध्ये लिहिले होते, ‘कृपया मला रजिस्ट्रेशन झालेल्या आणि विश्वासार्ह एनजीओंची माहिती द्या. जे 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटरचे (प्रति मिनिट 4 लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे) वाटप करण्यास मदत करतील हे कंसन्ट्रेटर थेट लंडनवरून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील.’
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी वेळोवेळी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मागील वर्षी अक्षयने कोरोनासाठी पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी रुपये दान केले होते.
याशिवाय त्याने काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या एका संस्थेला एक कोटी रुपये दान केले आहेत. गौतम गंभीरची ही संस्था गरीबांसाठी जेवणाची सोय करते.
Akshay Kumar – Twinkle Khanna’s helping hand, 100 oxygen concentrators to donate
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय कोव्हॅक्सिन लई भारी, विषाणूचे ६१७ प्रकार नष्ट करण्याची क्षमता, जयराम रमेश, शशी थरूर तोंडावर पडले
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- वसुधैव कुटुंबकम् ! सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; २५६ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल
- वसुधैव कुटुंबकम् ! व्हॅक्सिन करणार मानवतेची रक्षा …पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची चर्चा