विशेष प्रतिनिधी
नाशिक : राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे नाशिक शहर समितीच्यावतीने शहरातील लाखो घरांमध्ये श्री रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरीत करण्यात आल्या. नाशिक शहर समितीच्यावतीने तब्बल 4 लाखांहून अधिक घरी श्री रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता देण्यात आल्या असून या माध्यमातून तब्बल 16 लाखांहून अधिक लोकांपर्यंत संपर्क साधण्यात आला आहे.
Akshata of Shree Ramlalla Pranpratistha ceremony reached as many as 4 lakh homes in Nashik
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे नाशिक शहर समितीच्यावतीने दि. 1 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत संपूर्ण शहरात ‘गृहसंपर्क अभियान’ राबविण्यात आले. श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरीत करण्यासाठी राबविल्या गेलेल्या या अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अक्षतांसोबतच समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने एक माहिती पत्रक, मंदिराच्या संकल्पचित्राचे छायाचित्रदेखील देण्यात आले.
या अभियानात जवळपास 5,500 हजारांहून अधिक रामसेवकांनी सहभाग घेत 198 वस्त्यांमधील जवळपास 4 लाख घरांपर्यंत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे सदर गृहसंपर्क अभियानात 1,100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. 1000 हून अधिक लोक स्वेच्छेने या अभियानात सहभागी झाले. या अभियानांतर्गत विविध साधू संत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, उद्योजक, बिल्डर्स, डॉक्टर्स, सीए, संपादक अशा अनेक मान्यवरांनाही निमंत्रण अक्षता देण्यात आल्या.
नाशिकमध्ये वातावरण भक्तिमय
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्त याच दिवशी आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा करावा, त्याचप्रमाणे हा आनंदाचा प्रसंग असल्याने त्या दिवशी घरोघरीदेखील दीपमाळांची सजावट करावी, जवळच्या मंदिरात जाऊन राम नामाचा जप करावा आणि सणासुदीसारखा दिवस साजरा करावा असे आवाहन नाशिक शहर समितीने केले आहे. 22 जानेवारी रोजी अनेक मंदिरात थेट प्रक्षेपणासह, पूजाअर्चा आणि सामूहिक आरती केली जाणार आहे. अनेक सोसायटी, संस्थांतर्फे रामकथा, गीत रामायण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
Akshata of Shree Ramlalla Pranpratistha ceremony reached as many as 4 lakh homes in Nashik
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!