• Download App
    Akot BJP-MIM Alliance Breaks After Devendra Fadnavis Intervention PHOTOS VIDEOS अकोटमधील भाजप-MIM युती तुटली; देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर निर्णय, आमदार भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस

    Akot BJP : अकोटमधील भाजप-MIM युती तुटली; देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर निर्णय, आमदार भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस

    Akot BJP

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : Akot BJP सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती ‘तत्वशून्य’ असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावणार आहे.Akot BJP

    अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंच’ स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आता पक्षाच्या रडारवर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे अकोट शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी, गटनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून ‘कारण दाखवा’ नोटीस पाठवली जाणार आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेतृत्वाने या स्थानिक प्रयोगाबद्दल अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.Akot BJP



    MIM आता विरोधी बाकावर

    भाजपच्या दबावानंतर आणि राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. एमआयएमचे नगरसेवक आपला पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता एमआयएम अकोट नगरपालिकेत सत्ताधारी बाकावरून थेट विरोधी बाकावर बसणार आहे.

    कसे होते अकोटमधील सत्तेचे ‘अजब’ गणित?

    अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतासाठी त्यांना ७ जागांची गरज होती. यासाठी भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला, ज्यात चक्क एमआयएम (५ जागा) आणि इतर पक्षांना (शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार) एकत्र घेण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे या विचित्र युतीची नोंदणीही झाली होती, ज्यामुळे भाजपवर मोठी टीका झाली होती.

    अंबरनाथ मध्येही काँग्रेससोबत हातमिळवणी

    अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले होते. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, या युतीनंतर काँग्रेसकडून भाजपसोबत युती करणाऱ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

    स्थानिक नेत्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले

    दरम्यान, अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. “स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत,” असे फडणवीस म्हणालेत.

    भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न

    अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या भूमिकेमुळे ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि ‘हिंदुत्व’ या मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपला घेरले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हस्तक्षेप करत ही युती तोडण्याचे आदेश दिल्याने भाजपने आता ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला आहे.

    Akot BJP-MIM Alliance Breaks After Devendra Fadnavis Intervention PHOTOS VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मी बोलायचे ठरविले तर…; फडणवीसांचा अजितदादांना पुन्हा इशारा; महेश लांडगेंना बूस्टर डोस!!

    शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; पण ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!

    Ambernath : अंबरनाथमधील काॅंग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश