विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पाच जागा जिंकल्या. दोन जागांवर त्यांचे बंडखोर विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी घेतली आहे. Akola ZPVanchit aghadi win 5 seatsZP election
अकोला तालुक्यातील अकरा गटांचे निकाल असे, अंदुरा गट- मीना बावणे, शिर्ला गट- सुनील फाटकर, देगाव गट- राम गव्हाणकर आणि घुसर गट- शंकर इंगळे हे वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी झाले. या चारही ठिकाणी या उमेदवारांना सुरवातीपासून आघाडी होती. त्यांची लढत महाविकास आघाडीचे घटक असलेल्या पक्षांच्या उमेदवारांशी होती.
वंचित बहुजन आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यांचे विजयी उमेदवार असे, घुसर गटात शंकर इंगळे, देगाव गटात राम गव्हाणकर, शिर्ला गटात सुनील फाटकर, अंदुरा गटात मीना बावणे, कुरणखेड गटात सुशांत बोर्डे. लाखपूरी गटात सम्राट डोंगरदिवे आणि अडगाव गटातील प्रमोदिनी गोपाल कोल्हे हे दोघे अपक्ष व वंचित आघाडीचे बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.
अकोलखेड गटात शिवसेनेचे जगन निचळ विजयी झाले. बपोरी गटात माया कावरे (भाजप), कानशिवणी गटात किरण शिवा मोहोड आणि दगडपारवा गटात सुमन गावंडे हे दोघे राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार विजयी झाले.
Akola ZP Vanchit aghadi win 5 seats ZP election
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरांवर मोठे निर्बंध, पण शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी आग्रह
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली
- सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, गॅस सिलिंडर आजपासून पुन्हा महाग, असे चेक करा आपल्या शहरातील नवे दर
- स्वतःचे राज्य सोडून मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशात; छत्तीसगडच्या कवरधामध्ये दंगल, कर्फ्यू