निमा अरोरा या १४ जानेवारीपासून अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या नाहीत.दरम्यान त्यांच्या कार्यालयातील इतरांची वैद्यकीय तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. Akola District Collector Nima Arora’s coronation
विशेष प्रतिनिधी
अकोला : जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान त्यांची तब्बेत स्थिर असून त्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.१४ जानेवारीरोजी आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.दरम्यान त्यामध्ये निमा अरोरा यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली. निमा अरोरा या १४ जानेवारीपासून अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या नाहीत. दरम्यान त्यांच्या कार्यालयातील इतरांची वैद्यकीय तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले.
जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) १२३ नव्या कोरोना बाधितांची भर पडली. त्यासोबतच ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.