• Download App
    अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सुटणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे|Akola Airport Runway Expansion Work Will Be Resolved Soon - Minister of State Dattatraya Bharane

    अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सुटणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

    मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी अकोला विमानतळाच्या विकासाकरिता आढावा बैठक घेण्यात आली होती.Akola Airport Runway Expansion Work Will Be Resolved Soon – Minister of State Dattatraya Bharane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम प्रलंबित असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली की ,

    अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.या प्रश्नावरील चर्चेत सदस्य डॉ.रणजित पाटील, शशिकांत शिंदे, विक्रम काळे व संजय दौंड यांनी सहभाग घेतला होता.



    पुढे दत्तात्रय भरणे म्हणाले की , मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी अकोला विमानतळाच्या विकासाकरिता आढावा बैठक घेण्यात आली होती. या कामाबाबत वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत.लवकरात लवकर हे काम मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनासोबत बैठक घेतली जाईल अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

    Akola Airport Runway Expansion Work Will Be Resolved Soon – Minister of State Dattatraya Bharane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस