दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलन.
विशेष प्रतिनिधी
पुणे :साहित्य संमेलन हे सारस्वतांसाठी सामान्य रसिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या संमेलनाला. अनेक दिग्गज लेखक कवी गीतकार अध्यक्ष म्हणून लाभले. दरवर्षी साहित्य संमेलन ठरलं की अध्यक्ष कोण होणार याच्या चर्चा सारस्वत विश्वात रंगतात. आणि अनेक इच्छुक उमेदवारांची नावे समोर येतात .Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan
यावेळी देखील अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने शनिवारी पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं त्यातून राज्यातून आलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक न. म जोशी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कादंबरीकार डॉक्टर रवींद्र शोभणे आणि ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचा समावेश होता.
समेलन अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून, साहित्य महामंडळ आता संमेलन अध्यक्षांची सन्मानाने निवड करते. त्यानुसार कादंबरीकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांची अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही माहिती महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शोभणे यांना आतापर्यंत त्यांच्या साहित्य संपदेला विविध पुरस्कार मिळाले आहेत . यामध्ये त्यांच्या उत्तरायण महाराष्ट्र फाउंडेशन ( अमेरिका )चा पुरस्कार,मारवाडी फाउंडेशनचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, उत्तरायण साठी विदर्भ साहित्य संघाचा पु, यं देशपांडे कादंबरी पुरस्कार मिळाला आहे.
Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan
महत्वाच्या बातम्या