Friday, 2 May 2025
  • Download App
    अजितदादांची तिसऱ्या आघाडीची चाचपणी; त्यापाठोपाठ प्रकाश आंबेडकरांची ऑफर आली!!|Ajitdad's third front Test; After that came Prakash Ambedkar's offer!!

    अजितदादांची तिसऱ्या आघाडीची चाचपणी; त्यापाठोपाठ प्रकाश आंबेडकरांची ऑफर आली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपच्या वळचणीला जाऊन महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी केल्याची बातमी आली. ही बातमी येऊन एक दिवस उलटतोय ना तोच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना ऑफर दिली. महायुतीच्या सत्तेमधून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीशी युती करावी. अजितदादांचे राजकारण पुन्हा एस्टॅब्लिश करण्याची हमी मी घेतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी आज छत्रपती संभाजी नगर मधल्या पत्रकार परिषदेत केले.Ajitdad’s third front Test; After that came Prakash Ambedkar’s offer!!



    प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. तसेच आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिली आहे. आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करुन देऊ, असं आश्वासन आणि ऑफर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो”, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे. अजित पवार गटाने ही ऑफर स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं. पण हे कितपत शक्य आहे? ते आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    ‘राजकीय पक्षांनी संवेदनशील विषयांवर बोललं पाहिजे’

    राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. परिस्थिती स्फोटक आहे. एवढं सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे. निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे. एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. म्हणून ते भूमिका टाळत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

    राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असं ओबीसींना वाटतंय. हा धोका आहे. दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत की, आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कोणतंही सरकार निर्णय घेणार नाही, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले

    Ajitdad’s third front Test; After that came Prakash Ambedkar’s offer!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!