• Download App
    भाजपा प्रवेशाच्या चर्चांना अजितदादांचा पूर्णविराम; पण त्याचवेळी दिली शिंदे - फडणवीस सरकारच्या बहुमताची खात्री|Ajitdad's end to BJP entry talks; But at the same time assured the majority of the Shinde-Fadnavis government

    भाजपा प्रवेशाच्या चर्चांना अजितदादांचा पूर्णविराम; पण त्याचवेळी दिली शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुमताची खात्री

    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपूर मध्ये होत असताना अजितदादांनी भाजपच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला खरा, पण त्याचवेळी त्यांनी आकडेवारी सह शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुमताची खात्री पण देऊन टाकली.Ajitdad’s end to BJP entry talks; But at the same time assured the majority of the Shinde-Fadnavis government

    नागपूरच्या वज्रमुठ सभेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील बोलतील असे स्पष्ट करून आपण बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. अजितदादा म्हणाले, की गेल्या दोन दिवसांपासून बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे.



    नागपुरातही माझ्याबाबत चर्चा सुरू होत्या. अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती. पण, आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार आहेत. जनतेला फार वेळ थांबावे लागू नये म्हणून प्रत्येक पक्षाकडून दोघेच बोलतील असा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

    गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या देऊ नका

    दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेवरही अजित पवारांनी पडदा टाकला. “कुठे झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्यामुळे माझे अनिल देशमुखांशी बोलणे झाले. इथे एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहात नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज पसरविणाऱ्या बातम्या देऊ नका.

    बहुमताचा आकडा शिंदे – फडणवीसांकडे

    महाराष्ट्रातले शिंदे फडणवीस सरकार स्थिर आहे त्यांच्याकडे बहुमत आहे अगदी सोळा आमदार अपात्र झाले तरी त्यांच्या बहुमताला डग लागणार नाही अशी ग्वाही अजितदादांनी दिली. अपक्ष धरून भाजपाकडे ११५ आमदार आहेत. ४० आणि ११५ मिळून १५५ होतात. आणि इतर १० आमदार आहेत. म्हणजे १६५ होतात. बहुमताचा आकडा १४५ आहे. उद्या १६ आमदार अपात्र झाले तरी विधानसभेतला बहुमताचा आकडा आपोआपच कमी होतो त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने 145 पेक्षा नक्की जास्त आमदार राहतील ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकार स्थिर आहे हे आपण समजून घेतले पाहिजे आणि वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.

    नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत असताना अजितदादा यांच्यासारख्या विरोधी पक्ष नेत्याने शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुमताची खात्री देणे याचा राजकीय अर्थ नेमका काय असू शकतो? त्यामुळे त्यातून महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतून सरकारवर होणारे हल्ले बोथट करण्याचे काम झाले आहे का?, याविषयी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

    Ajitdad’s end to BJP entry talks; But at the same time assured the majority of the Shinde-Fadnavis government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक