प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेला पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्रातला प्रचंड चर्चेचा विषय सोडून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलले. झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत अजितदादांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस वगैरे मुद्द्यांवर विचारलेल्या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. पण फडणवीस यांच्या समवेत झालेल्या पहाटेच्या शपथविधी वर आपण बोलणार नाही. आपण आपल्या मतांवर ठाम असतो. कुणीही कितीही विचारले तरी या विषयावर बोलणार नाही, असे अजितदादांनी स्पष्ट करून त्या विषयावर बोलण्याचे टाळले.Ajitdada spoke on all topics except the early morning swearing-in ceremony!
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी या संदर्भात मध्यंतरीच्या काळात अनेक खुलासे केले आहेत. अजितदादांबरोबरच शपथविधी हा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता. सर्वकाही वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ठरले होते. अजितदादा देखील प्रामाणिकपणे आमच्याबरोबर आले होते. परंतु नंतर शरद पवारांनी भूमिका बदलली. आमच्याबरोबर विश्वासघात झाला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्याचवेळी आपण सांगितलेले सत्य सध्या अर्धेच आहे. ते अर्धसत्य नव्हे, पण जे बोललो ते अर्धेच बोललो. उरलेले अर्धे नंतर सांगणार आहे, असा इशाराही फडणवीस यांनी मुलाखतींमधून दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील सुरुवातीला फडणवीसांच्या मुलाखतींवर उत्तर देऊन आपण त्यांचे महत्त्व वाढवू इच्छित नाही, असा दावा केला होता. पण नंतर फडणवीस आणि अजितदादा यांची शपथ झाली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. नंतर त्या वक्तव्याबाबत देखील पवारांनी भूमिका बदलून आपण ते गमतीत बोललो होतो, असा दावा केला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे पवारांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.
त्यामुळे पहाटेच्या शपथविधी वर अजितदादांनी बोलावे. आपली बाजू मांडून आणि महाराष्ट्राला सर्व खुलासा करावा, यासाठी सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना वारंवार प्रश्न विचारत असतात. परंतु ते त्या विषयावर बोलणे टाळतात. झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत देखील अजितदादांनी पहाटेचा शपथविधी या विषयावर बोलण्याचे पूर्णपणे टाळले.
Ajitdada spoke on all topics except the early morning swearing-in ceremony!
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!
- मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज