नाशिक : बारामतीच्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार कालवश झाले. त्यानंतर या अपघाताविषयी अनेकांनी अनेक संशय व्यक्त केले. पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी राजकीय संशय पेरणी केली. अजित पवार म्हणे, भाजपची साथ सोडणार होते. त्यामुळेच हा विमान अपघात घडवून त्यांना नाहीसे करण्यात आले, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. या देशात कुणीच सुरक्षित नाही. अजित पवार भाजपची साथ सोडून त्यांच्या मूळ प्रवाहात जाणार होते त्यामुळे या विमान अपघाताची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करावी. कारण कुठल्याही एजन्सीवर माझा विश्वास नाही, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले.Ajitdada said he was going to leave BJP; How true is Mamata Banerjee’s suspicions??, how false
– ममतांनी मारली पाचर
या राजकीय संशय पेरणीतून ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात पाचर मारण्याचा डाव खेळला, पण ममता बॅनर्जी यांचा एकूण राजकीय स्वभाव पाहता त्यांनी केलेली संशय पेरणी किती खरी आणि किती खोटी??, असा सवाल तयार झाला.
– अजित पवार कायमच सत्तेच्या वळचणीला
वास्तविक अजित पवारांनी भाजपची साथ धरणे आणि भाजपची साथ सोडणे या दोन्ही गोष्टी मूळातच अजित पवारांच्या हातात नव्हत्या. कारण भाजपला अजित पवारांच्या राजकीय साथीची गरजच नव्हती. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दीर्घकालीन राजकारणाची गरज आणि व्यवस्था लक्षात घेऊन महाराष्ट्रापुरते अजित पवारांना साथीला घेतले. यात भाजपच्या गरजेपेक्षा अजित पवारांची सत्तेची गरज जास्त भागवली गेली. कारण सत्तेच्या खेरीज राजकारण करता येत नाही आणि राजकारणाखेरीज समाजकारण करता येत नाही, हे यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले राजकीय सूत्र अजित पवार पाळत होते. त्यामुळेच शरद पवार किंवा अजित पवार हे सत्तेच्या तुकड्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशी रास्त टीका सुद्धा अजित पवारांनी सहन केली, पण त्यांनी कुठल्याच सत्तेची साथ सोडली नाही.
– भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अजितदादांची प्रतिमाहानी
अजित पवारांच्या सत्ता काळात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल भाजपच्या नेत्यांनी अनेकदा त्यांना धारेवर धरले होते. यात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा होता, तरी देखील फडणवीसांच्या वरिष्ठांनी त्यांना अजित पवारांना बरोबर घेण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी मुकाट्याने अजित पवारांना आपल्या साथीला घेतले होते. यात भाजपने वरकरणी स्वतःचे राजकीय नुकसान करून घेतले, पण प्रत्यक्षात प्रतिमाहानी मात्र अजित पवारांची होत राहील याची “व्यवस्थित काळजी” घेतली.
– दोन्हीकडून सत्तेची उब
अजित पवार तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री पदाची आशा आणि अपेक्षा होती पण तेवढे राजकीय कर्तृत्व नसल्याने ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, पण म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी कुठला राजकीय संघर्ष करून ते पद मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्याचबरोबर कुठल्याच कारणाने काँग्रेसच्या किंवा भाजपच्या सत्तेची स्वतःहून साथ सोडण्याचा डाव सुद्धा खेळला नाही. उलट काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन त्यासाठीची उब घेणे आणि तिचे लाभ घेणे, हेच अजित पवारांनी आपले “राजकीय कर्तव्य” मानले होते. त्यानुसार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला ते स्वतःहून जाऊन बसले होते.
मर्यादा ओलांडल्यानंतर अजितदादांना “शिक्षा”
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने त्यांना उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आम्हाला बरोबर घेता येणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय सूचनेनुसारच त्यांनी महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची टीका केली. टीका करताना मर्यादा सुद्धा ओलांडली, म्हणून त्यांना त्याची “शिक्षा” पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये पुरेशी मिळाली. त्यांना भाजपने दोन्ही ठिकाणी पराभवाचा दणका दिला. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी स्वतःच्या वक्तव्यांना लगाम घातला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी आजपर्यंत भाजपवर टीका करणे टाळले होते.
– सत्तेची साथ सोडणे शक्यच नव्हते
महापालिका निवडणुकांच्या प्रचारात किंवा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी कधीही आपण भाजपच्या सत्तेची साथ सोडू, अशी साधी सूचक प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नव्हती. कारण सत्तेची साथ सोडून खऱ्या अर्थाने संघर्षाचे राजकारण करणे हे अजित पवारांच्या राजकारणाचे कधीच सूत्र नव्हते. त्याउलट कुठल्याही सत्तेच्या जास्तीत जास्त जवळ राहून आणि सत्तेचा मोठ्यातला मोठा तुकडा मिळवून आपले राजकारण पुढे रेटत राहणे, हे अजित पवारांच्या राजकारणाचे मूलभूत सूत्र होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी अजित पवार भाजपची साथ सोडणार होते, अशी राजकीय संशय पेरणी कितीही केली, तरी प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नव्हती आणि नाही. कारण अजितदादांना ते “परवडणारे” नव्हते.
Ajitdada said he was going to leave BJP; How true is Mamata Banerjee’s suspicions??, how false
महत्वाच्या बातम्या
- CM MK Stalin : स्टालिन म्हणाले- तमिळनाडूमध्ये हिंदीसाठी जागा नाही; भाषा लादण्याचा नेहमीच विरोध करू
- 77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष; उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर!!
- उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन
- संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर