• Download App
    अजितदादा - फडणवीसांचे आरोप एका दिशेला; राऊत यांचे आरोप विरुद्ध दिशेला!! Ajitdada - Fadnavis' allegations in one direction; Raut's allegations go in the opposite direction !!

    ST Mastersmind? : अजितदादा – फडणवीसांचे आरोप एका दिशेला; राऊत यांचे आरोप विरुद्ध दिशेला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दगडफेक आणि चप्पल फेक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटले. परंतु, त्यात देखील वेगवेगळे राजकीय रंग दिसून येत आहेत.Ajitdada – Fadnavis’ allegations in one direction; Raut’s allegations go in the opposite direction !!

    यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप एका दिशेला तर शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांचे आरोप विरुद्ध दिशेला होत असल्याचे दिसत आहे.

    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण घटनेचा ठपका मुंबई पोलिसांच्या अपयशावर ठेवला आहे. प्रसारमाध्यमांना आंदोलनाची दिशा कळू शकते. आंदोलक सिल्वर ओकच्या दिशेने जात आहेत हे प्रसार माध्यमांना माहिती होते पण पोलिसांना माहिती होत नाही याचा अर्थ काय? त्याचबरोबर या हल्ल्यामागे नेमके कोण आहे? पोलिसांना का नाही कळू शकले? पोलिसांनी तिथे बंदोबस्त का नाही वाढवला? कुठेतरी यंत्रणेचा हा दोष आहे, असा आरोप अजित पवार यांनी पोलिस यंत्रणेवर केला आहे.

    नेमका असाच आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर केला आहे. सिल्वर ओकवरील दगडफेक आणि चप्पल फेकीचा निषेध फडणवीसांनी केला आहेच, पण या हल्ल्यामागे नेमके कोण आहेत याचा मास्टरमाइंड सोडला पाहिजे. तो पोलिसांनी शोधावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आरोप एका दिशेला होत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी या संपूर्ण राजकीय फियास्कोचा ठपका भाजप वर ठेवला आहे. महाराष्ट्रात भाजपला अराजक निर्माण करायचे आहे. तीन पक्षाचे सरकार चांगले चालू आहे हे त्यांना बघवत नाही. म्हणून ते एसटी कर्मचाऱ्यांचा हत्यारासारखा वापर करून त्यांच्या भावना भडकवत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किंबहुना संजय राऊत यांनी भाजपवर आरोपांच्या एकापाठोपाठ एक फैरी झाडल्या आहेत.

    त्याच वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना देखील घेरले आहे. हे दोघेही कुठे गायब झाले आहेत. चोरच नेहमी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

    Ajitdada – Fadnavis’ allegations in one direction; Raut’s allegations go in the opposite direction !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!