• Download App
    अजितदादांचा वाढदिवस : धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र फटाके फोडले, नंतर एकमेकांमध्ये भिडले!!Ajitdada birthday in Dhule Activists burst crackers together, then clashed with each other!!

    अजितदादांचा वाढदिवस : धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र फटाके फोडले, नंतर एकमेकांमध्ये भिडले!!

    प्रतिनिधी

    धुळे : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे केक कापून साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. मात्र या सेलिब्रेशननंतर दुसऱ्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गटबाजी आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. Ajitdada birthday in Dhule Activists burst crackers together, then clashed with each other!!



    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे समर्थक व शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले समर्थक यांच्यात धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या श्रेय वादावरून चांगलीच हमरातुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवन या इमारतीचे श्रमदानातून नूतनीकरण अनिल गोटे यांच्याकडून करण्यात येत आहे, त्या नूतनीकरणाच्या कार्यात शहर जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता बऱ्याच गोष्टीत बदल करण्यात आला असल्याने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    इतकेच नाही तर त्यावर अनिल गोटे समर्थकांनी जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या नऊ महिन्यात एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप केला. यावरून एकमेकांवर आरोप करत दोघेही गट चांगलेच आक्रमक होऊन एकमेकांमध्ये भिडले. यानंतर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यमस्थी करत दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीला अजितदादांच्या वाढदिवसाचा मुहूर्त मिळाला.

    Ajitdada birthday in Dhule Activists burst crackers together, then clashed with each other!!

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!