प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचे बहुमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करून देखील शिवसेनेचे आमदार माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाबरोबर राहिले, असे सांगून पवार ठाकरे यांना टोले लगावले होते. Ajit Pawar’s remarks to the BJP’s central leadership on the issue of defeating BJP loyalists
पण एकनाथ शिंदेंच्या या टोल्यांना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपच्या निष्ठावंतांना डावल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला टोले लगावले. त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही चिमटा काढला. एकनाथजी, तुम्ही माझ्या कानात जरी सांगितले असते की उद्धवजींना सांगा अडीच वर्ष झालीत आता मला मुख्यमंत्री पदावर बसवा. तर आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवले असते. पण तुम्ही तिकडे म्हणजे भाजपकडे गेलात आणि मुख्यमंत्री बनतात पण या सगळ्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय केला, असे अजित पवार म्हणाले.
सत्ताधारी बाकांवर पहिल्या रांगेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतूनच गेलेले अनेक नेते दिसत आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि कार्यक्षम नेत्याला उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. भाजपचे अनेक निष्ठावंत नेते ज्यांनी पक्षासाठी संघर्ष केला, पोस्टर बॅनर लावले त्यांना मागे ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांनाच तिथे मानसन्मान दिला गेला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात तरी भाजपच्या निष्ठावानांना किती संधी मिळेल? अशी शंका वाटते, असा टोला अजितदादांनी लगावला.
परंतु एकंदरीत सभागृहाले वातावरण शांत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी देखील राहुल नार्वेकरांचे अभिनंदन करताना शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षाच्या व्हीप विरोधात जाऊन मतदान केले आहे. अध्यक्ष पदाचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे आपण किती दिवस अध्यक्षपदावर राहू शकता याविषयी शंका वाटते, असे सांगून शिंदे फडणवीस सरकारच्या अस्थिरते विषयी भाष्य केले.
– विश्वनाथन आनंद आणि अमित शहा
त्याचवेळी मध्येच उठून छगन भुजबळ यांनी आपल्याला एक मेसेज आल्याचे सांगितले. विश्वनाथन आनंद याला देखील अमित शहा यांनी बुद्धिबळाच्या गेम मध्ये हरवल्याचा मुश्किल उल्लेख केला. विश्वनाथन आनंद सारखा जग्गजेता बुद्धिबळपटू देखील अमित शहा यांच्याशी बुद्धिबळ खेळायला नकार देत आहे. कारण अमित शहा नेमक्या कोणत्या चाली खेळतात हे कळत नाही. ते असा मोहरा फिरवतात की त्यामुळे बाकीचे सगळेच मोहरे गारद होतात, असा उल्लेख करून छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला टोला लगावला.
Ajit Pawar’s remarks to the BJP’s central leadership on the issue of defeating BJP loyalists
महत्वाच्या बातम्या
- Nupur Shrama Row : नुपूर शर्माविरोधात कोलकाता पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस, जाणून घ्या, कोणत्या राज्यांत दाखल आहेत गुन्हे?
- Pakistan Blasphemy : पाकिस्तानमधील सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप; प्रचंड गोंधळ, 27 कर्मचारी ताब्यात
- अमरावती हत्याकांड : मुख्य आरोपीच्या नागपुरातून आवळल्या मुसक्या, पोलिसांनी आठ दिवस झाकून ठेवले कारण
- द फोकस एक्सप्लेनर : शिंदेसेना की उद्धवसेना? कोणाचा व्हीप वैध? काय होणार परिणाम? कायदेशीर अडचण काय? वाचा सविस्तर