नाशिक : भाजपच्या सत्तेच्या वळसणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली असल्याचे आज दिसून आले. पण त्याच वेळी मागच्या दाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी केल्याचा डावही समोर आला. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक दिवसाच्या अधिवेशन नागपुरात होत असून दिवसभराच्या मंथनानंतर अजितदादा नागपूर डिक्लरेशन प्रसिद्ध करणार आहेत. Ajit Pawar
आजच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महत्त्वाचे विधान केले. मुंबई वगळता अजित पवार यांची राष्ट्रवादी सर्वत्र स्वबळावर निवडणुका लढवायचा विचार करेल, असे ते म्हणाले. पण त्याचवेळी स्थानिक पातळीवर कुणी कुणाशी युती करायची याचा निर्णय स्थानिक नेते घेतील तो त्यांचा अधिकार असेल, अशी “मेख” प्रफुल्ल पटेल यांनी मारून ठेवली. याचा अर्थच राज्यात भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण पोषण करत राहायचे आणि आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान बांधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त राजकीय पाय पसरायचा डाव अजितदादांच्या राष्ट्रवादीने आखल्याचे दिसून आले.
राज्यात भाजप महायुतीच्या सत्तेत अजितदादांची राष्ट्रवादी सगळ्यात ज्युनिअर पार्टनर आहे ज्युनिअर पार्टनर हा शब्द स्वतः अजितदादांनी आजच्या अधिवेशनात बोलून दाखविला. पण त्याचवेळी अजितदादांची मुख्यमंत्री होण्याचे महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. पण ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंगात तेवढे राजकीय कर्तृत्वही नाही. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जेवढे राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवायचे तेवढे मिळवत आहे. पण तरी देखील आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अजितदारांचा राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई वगळता महाराष्ट्रात इतरत्र म्हणजेच पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर आधी महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करून टाकली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले :
आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फक्त मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढण्यावर विचार करत आहोत. मात्र उर्वरीत राज्यात स्वतंत्र निवडणुकीला आम्ही पुढे जावू. त्यामुळे पक्ष वाढीस मदत होते, स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. आम्ही त्यात बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मेघालय, मणिपूर, बिहारमध्ये निवडणुका लढणार आहे.
मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचं असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीनं या. नाही तर दोन तासांचे पर्यटक म्हणून यायचं आणि मुंबईत जाऊन दादा आणि तटकरे साहेबांसमोर येतात. मी या जिल्ह्यात जाऊन आलो, हे करुन आलो, याला काही अर्थ नाही.
मी जे वक्तव्य केले ते फक्त विदर्भातील पालकमंत्र्यांपुरते नाही तर आमच्या सर्व पालकमंत्र्यांसंदर्भात बोललो. आमच्या पालकमंत्र्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले नाही तर मग आमचा पक्ष कसा वाढेल? बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला पालकमंत्री असला तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात. त्यांच्या सोबत समन्वयाने काम करायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री पक्ष बांधणीकडे पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. त्यांनी असे करू नये, हा माझा बोलण्याचा उद्देश आहे.
Ajit Pawar’s NCP to contest local elections alone
महत्वाच्या बातम्या
- अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज
- साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!
- Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील