विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीतली काका – पुतण्यांची लढाई आता त्यांच्या अनुयायांची वैयक्तिक लढाई झाली आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची?? काकांची का पुतण्याची??, या वादावर निवडणूक आयोगात सुनावणी होत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून अजित पवारांवर खळबळजनक आरोप केला. Ajit Pawars lawyer claims there was a dispute since 2019 since he took oath with the BJP Govt basis support of 53 MLAs
अजित पवारांच्या वकिलांनी निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातल्या मतभेदांची मांडणी करताना 2019 मधल्या शपथविधीचा हवाला दिला. 2019 पासूनच शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वाद होते, असा युक्तिवाद अजित पवारांच्या वकीलांनी केला. त्या युक्तीवादावरच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून अजित पवारांवर 53 आमदारांच्या सह्यांचे पत्र चोरल्याचा आरोप केला. अजित पवार गटाचे वकील 2019 चा जो हवाला देत आहेत तो मुळात चोरलेल्या पत्रावर आधारित आहे आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित दादांनी चोरले त्यामुळेच त्यांना 72 तासांच्या आत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मधून केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट असे :
डॉ. जितेंद्र आव्हाड @Awhadspeaks अजित पवार यांच्या वकिलाचा दावा आहे की, अजित पवारांनी भाजपच्या सरकारमध्ये जाण्यासाठी 53 आमदारांचा पाठिंबा मिळवला. त्या 53 आमदारांच्या पाठिंब्यावरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून 2019 पासून वाद सुरू होता. पण त्यांना कदाचित माहीत नसावे की, ते सह्यांचे पत्र चोरले होते. त्यामुळेच त्यांना 72 तासांमध्ये राजीनामा द्यावा लागला होता. पण नंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पद आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाचे लाभ मिळवण्यासाठी अजित पवार गप्प राहिले.
सुरुवातीला अजित पवारांचे वकील सांगायचे, की शरद पवारांच्या निवडीवर आमचा काहीही आक्षेप नाही. पण नंतर मात्र ते सातत्याने शरद पवारांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवर आक्षेप घेत राहिले. निवडणूक आयोगातल्या याचिकेत तर त्यांनी सर्व काही शरद पवारांविरुद्धच लिहिले आहे. शरद पवार पक्षाचे मालक असल्यासारखे वागतात, असा त्यांचा नवा आरोप आहे. अजित पवारांच्या वकिलांच्या युक्तिवादात ही फार मोठी विसंगती आहे.
Ajit Pawars lawyer claims there was a dispute since 2019 since he took oath with the BJP Govt basis support of 53 MLAs
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!