विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातला शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचे खातेवाटप याविषयी मराठी माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. किंबहुना सोडल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या खातेवाटपा संदर्भात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतरही मराठी माध्यमांच्या बातम्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट अजितदादा अर्थ, महसूल, जलसंपदा या खात्यासाठी आग्रही असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. पण याचा अर्थ माध्यमांनीच चालविला मूळ अजेंडा आता संपुष्टाचा आला का??, असा सवाल तयार झाला आहे. Ajit pawar’s chief ministerial ambition in the back burner
अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजितदादांना मुख्यमंत्रीपदाचेच आश्वासन भाजपने दिले आहे. लवकरच त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. पण त्या बातम्या आता हवेत विरल्या आहेत. त्या उलट अजितदादा अर्थ, महसूल आणि जलसंपदा या खात्यासाठी आग्रही असल्याच्या बातम्या माध्यमांनी पुढे सरकविल्या आहेत.
तसाही अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या बातम्यांना कोणता ठोस आधार नव्हता. कारण भाजपच्या कुठल्याही अधिकृत सूत्रांनी त्याविषयी काहीही भाष्य केले नव्हते. अजितदादांनी फक्त मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वकांक्षा 5 जुलैच्या मेळाव्यात बोलून दाखवली आणि त्यावेळी भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस मराठी माध्यमातून चालविल्या. इतकेच काय तर अजित दादा येत्या 8 दिवसात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
कारण एकनाथ शिंदेंच्या आणि त्यांच्याबरोबरच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊन त्यांना अपात्र ठरवतील आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशा बातम्यांचे पतंग माध्यमांनी उडविले होते. प्रत्यक्षात हे पतंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काटून टाकले. कारण ना एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेचा निर्णय झाला, ना त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मराठी माध्यमांच्या त्या बातम्या खोट्या ठरल्या.
नंतर अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्यांचे पतंग माध्यमांनी हवेत उडवले पण आता तेही पतंग काटले गेलेत. नेमके हेच अजितदादा संदर्भात खात्यांच्या आग्रहाच्या नव्या बातम्या हवेत सोडून माध्यमांनी कबूल केलेले दिसते आहे.
Ajit pawar’s chief ministerial ambition in the back burner
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त