• Download App
    Ajit Pawar अजितदादा ठोकणार बारामतीला रामराम

    Ajit Pawar : अजितदादा ठोकणार बारामतीला रामराम; मतदारांना सांगितले, मिळवा नवा आमदार!!

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनेत्रा पवारांचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर अजितदादा बारामतीला कंटाळल्याची काही उदाहरणे समोर आली. आज तर त्यांनी उघडपणे बारामतीला रामराम ठोकण्याचा विचार बोलून दाखवत मतदारांना नवा आमदार मिळवा, असे सांगून टाकले. Ajit Pawar will not contest from Baramati

    बारामतीत एका मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी लोकसभेला झालेल्या पराभवावर भाष्य केले. विकासकामे करुन देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील, तर बारामतीला देखील मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी, असे आव्हान अजितदादांनी बारामतीकरांना दिले.


    Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!


    अजितदादा म्हणाले :

    मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्याने काम नाही केले, तर गडबड होते मान्य केलं पाहिजे. कोणतीही निवडणूक असो किंवा आजची बैठक असो, कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळे मिळाली.

    पण मी पण शेवटी माणूस आहे, मला पण विचार येतो एवढी सगळी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग आपण तर दुसऱ्यांना खासदार करु शकतो. नितीन पाटलांना, प्रफुल्ल पटेलांना खासदार केलं. आमदार राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं, शिवाजीराव गर्जे यांना आमदार केलं. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली.  आपण लाखानं निवडून येणारी माणसं, मी पण आता 65 वर्षांचा झालो. आपण पण तसं समाधानी आहे. जिथं पिकतं तिथं विकत नसतं,बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझी 1991 ते 2024 या  माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं काम बघा!!

    आज न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, आता किती कोटींच्या योजनांची कामं सुरु आहेत. बारामती शहर सोडून 750 कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. कशाला म्हणतात 850 कोटी?? यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत, काही खराब आहेत ते कसे करायचे ते पाहू, न मागता मेडिकल कॉलेज मिळतं, तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज केलं!!

    सकाळपासून उठून कामं करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणीन काही नाही, जे आहे ते आहे. ही बारामतीच्या भवितव्याची निवडणूक आहे, सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे.

    Ajit Pawar will not contest from Baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस