विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादांना एंट्री देऊन भाजपने आधीच महायुतीत ठिणगी पाडून घेतली. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने वाटपात जागा वाढवून घेण्यासाठी महायुतीत रेटारेटी सुरू केली आहे. Ajit pawar trying to grab more seats in mahayuti
अजितदादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत एन्ट्री केल्यानंतर सुरुवातीला सत्तेची फळे चाखताना अजितदारांचे नेते सुरवातीला “शांतपणे” ते काम करत होते, पण महायुती वेगवेगळ्या विषयांवर अडचणीत आल्यानंतर मात्र अजितदादांच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रवादी प्रवृत्तीची नखे बाहेर काढून महायुतीतल्याच पक्षांना घायाळ करायला सुरुवात केली. महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी प्रत्युत्तरे द्यायला सुरुवात केल्यानंतर स्वतः अजितदादा आज मैदानात उतरले. महायुतीच्या काही नेत्यांनी माझ्यावर टीका केली, तर मला माझ्या अंगाला भोके पडत नाहीत, पण मग आमचेही कार्यकर्ते बोलायला लागतील, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी नागपूरमध्ये व्यक्त करून आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मालवण मधल्या राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याच्या शिल्पकाराच्या “आपटे” आडनावावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्यावेळी अजितदादा काही बोलले नाहीत, पण भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी – भाजप युतीला “असंगाशी संग” म्हटल्याबरोबर अजितदादांनी नागपुरात फणा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आम्ही महायुती केली. बाकीचे कोणी काही त्यावर बोलले, तर माझ्या अंगाला भोके पडत नाहीत, पण इतर कोण बोलत असतील, तर आमचेही कार्यकर्ते बोलू लागतील, अशी इशारेवजा चिथावणी अजितदादांनी दिली.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत राष्ट्रवादी विरुद्ध बोलल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजितदादांना सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावर अजित दादा काही बोलले नाही त्यांनी सत्ताही अद्याप सोडलेली नाही. पण भाजपचे प्रवक्ते गणेश हाके बोलल्यानंतर मात्र अजितदादांनी फणा काढला.
त्या पलीकडे जाऊन आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने जागा वाटपाचा रेटारेटी सुरू केली. राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. आणखी 6 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला महायुतीत 60 जागा लढवायला दिल्या पाहिजेत, असे अजितदादा म्हणाल्याची बातमी मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केली. त्यासाठी त्यांनी 6 आमदारांची नावे देखील सांगितली. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी, हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत याखेरीज संजयमामा शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे राष्ट्रवादी म्हणून कडूनच लढणार असल्याचा दावा अजित पवारांनी केला. त्यामुळे आपला आकडा 60 आमदारांचा असल्याचा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीने केला. महायुतीत अजितदादांनी जागावापतात अशी रेटारेटी सुरू केली.
Ajit pawar trying to grab more seats in mahayuti
महत्वाच्या बातम्या
- Rajnath Singh : ‘स्वातंत्र्यानंतर महिलांना देशाच्या विकासात योगदान देण्यापासून वंचित ठेवण्यात आले’
- PM Kisan Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान निधीची रक्कम परत करावी लागणार!
- S Jaishankars : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पाकिस्तानवर परखड भाष्य, म्हणाले…
- Arabian Sea Cyclone : अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा कच्छवर परिणाम, घरे रिकामी करण्याचे आदेश, 75 किमी प्रतितास वेगाने वाहणार वारे