• Download App
    Ajit Pawar's Warning to Beed Criminals: 'Don't Make Me Angry, or I Will Impose MCOCA'अजित पवारांचा बीडमधील गुन्हेगारांना दम- मला वाकड्यात जायला लावू नका

    Ajit Pawar : अजित पवारांचा बीडमधील गुन्हेगारांना दम- मला वाकड्यात जायला लावू नका, नाहीतर मोक्का लावणार!

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    बीड :Ajit Pawar   “मला वाकड्यात जायला लावू नका. सांगूनही ऐकले नाही, तर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका मांडत, कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.Ajit Pawar

    आज सकाळपासून अजित पवार बीड दौऱ्यावर असून, त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. याच दौऱ्यावेळी वडवणीतील मुंडे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशही पार पडला. मात्र, या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.Ajit Pawar



    नेमके काय म्हणाले अजित पवार?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात बोलताना जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे निर्माण झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार, असा स्पष्ट संदेश दिला. आपल्या जिल्ह्याची बदनामी झाली आहे. हे सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. चुका करणाऱ्याला शासन झाले पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षातला असो. मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकले नाही तर अशा लोकांना मोक्का लावण्यात येईल, मग पुन्हा काय चक्की पिसिंग पिसिंग… असे म्हणत अजित पवारांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तंबी दिली.

    बीडसाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, कुणीही चुकीचे काम करू नये, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना केले.

    धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत बीडमध्ये पक्षप्रवेश

    वडवणी येथील भाजपचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात झाला. धनंजय मुंडेंची या सोहळ्याला उपस्थिती नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एवढेच नव्हे, तर व्यासपीठावर त्यांचा फोटोही दिसला नाही. यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत आता दोन गट निर्माण झालेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत हा अजित पवारांचा पहिलाच बीडमधील पक्षीय कार्यक्रम ठरला.

    पावसाने केला अडथळा

    वडवणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्याला दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला. सभा मंडपाला पाणी गळती लागल्याने अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून माघार घेतली. परिणामी, पक्षप्रवेशाचा उत्साह काहीसा कमी पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

    Ajit Pawar’s Warning to Beed Criminals: ‘Don’t Make Me Angry, or I Will Impose MCOCA’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !