• Download App
    Ajit Pawar मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!

    मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!! असे काका – पुतण्याचे राजकारण आज रंगले. एकीकडे मनोज जरांगे ऐन गणपती उत्सवात हट्टाला पेटले. त्याचवेळी शरद पवारांनी आधीची भूमिका बदलून घुमजाव केले. चार वेळा मुख्यमंत्री पद मिळूनही मराठ्यांना आरक्षण न देणारे शरद पवार अचानक मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलायला लागले. तामिळनाडूत 72 % पर्यंत आरक्षण पोचू शकते, तर महाराष्ट्रात का नाही पोहोचू शकणार??, त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागेल. हा केंद्र सरकारचा विषय आहे, असे शरद पवार म्हणाले.



    शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिले नाही. उलट्या मुद्द्यावर शालिनीताई पाटलांची मतभेद झाल्यानंतर शालिनीताईंना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरचा रस्ता दाखविला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, अशी त्याऐवजी त्यांची भूमिका होती.

    पण 2014 नंतर सगळीच गणिते फिरली पवारांच्या मनाविरुद्धचे मुख्यमंत्री राज्यावर बसले. पवारांचे अख्खे राजकारण फिरून गेले त्यामुळे आता पवारांना मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलायची उपरती झाली. म्हणून त्यांनी तामिळनाडूचा हवाला देऊन आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करायची सूचना केली. मराठा आरक्षणाचा विषय त्यांनी केंद्र सरकारच्या गळ्यात घातला.

    मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी ज्यांनी काही सूचना केल्यात, ते सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय आहेत. पण ते 10 – 10 वर्षे सत्तेवर होते. तेव्हा त्यांनी काही केले नाही. मला त्याबद्दल बोलायला लावून खोलात जायला लावू नका, असा टोला शरद पवारांना हाणला. काकांचे सत्तेचे राजकारण पुतण्याने उघडे पाडले.

    Ajit Pawar targets Sharad Pawar over Maratha reservation issue

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    जातींच्या अस्मिता भडकवून अखंड हिंदू समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा; प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींचे परखड आवाहन

    मनोज जरांगेंनी तोफ काँग्रेसकडे वळविली; पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवली!!

    क्रीडा क्षेत्रातल्या पवार कुटुंबाच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग; काकांच्या पाठोपाठ पुतण्याच्या वर्चस्वावरही प्रहार; ऑलिंपिक संघटना निवडणुकीत अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत!!