• Download App
    आधी राजीनामा देऊन, नंतर आंदोलन करायला लावून शरद पवारांनी सर्वांना गाफील ठेवले; अजितदादांनी जुने वाभाडे काढले!! Ajit pawar targets Sharad pawar, he kept all leaders in the dark while taking any decision!!

    आधी राजीनामा देऊन, नंतर आंदोलन करायला लावून शरद पवारांनी सर्वांना गाफील ठेवले; अजितदादांनी जुने वाभाडे काढले!!

    विशेष प्रतिनिधी

    रायगड :  शरद पवारांनी कायमच धरसोड वृत्ती ठेवली. आधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतर कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावले. सर्वच निर्णयांचे वेळी आमच्यासारख्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गाफील ठेवले, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचे पुरते वाभाडे काढले. Ajit pawar targets Sharad pawar, he kept all leaders in the dark while taking any decision!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन रायगडमधील कर्जत येथे झाले. या अधिवेशनात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या सगळ्या “आतल्या” गोष्टी बाहेर जाहीरपणे सांगितल्या. शरद पवारांचे राजीनामा नाट्य, सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची धडपड हे सगळं कसं अयशस्वी ठरलं??, याची तपशीलवार माहिती अजित पवारांनी दिली.

    अजित पवारांनी शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी नेमकं काय केव्हा आणि कुठे घडलं? हे तपशीलवार सांगितलं. शरद पवार कायम आम्हाला गाफील ठेवत होते. त्यांनी आधी आम्हाला मंत्रिमंडळात जायला सांगितलं. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजीनामा देत आहे, असंही सांगितलं आणि अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मागं घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना आंदोलन करण्यासाठी देखील शरद पवारांनीच आदेश दिले, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांचे पुरते वाभाडे काढले.

    अजित पवार म्हणाले :

    वरिष्ठांनी आम्हाला सातत्यानं गाफील ठेवलं. मी मागं जात नाही, पण यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखांना सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही 10 – 12 जण होतो. देवगिरी बंगल्यावर बसलो होतो. आम्ही काय करायचं??, असा विचार करत होतो. थेट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल?? याचा विचार करुन सुप्रिया सुळेंना घरी बोलावलं होतं. त्यांना सांगितलं की लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. त्यांनी 7 दिवसांचा वेळ मागितला, शरद पवारांना कन्व्हिन्स करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    आम्ही 7 ते 10 दिवस थांबलो. जयंत पाटील आणि अनिल देशमुख पण होते. सरकारमध्ये जायला हवं, अल्पसंख्यांक समाजाचा विचार झाला पाहिजे. स्थगित्या उठल्या पाहिजेत या भूमिकेतून शरद पवार यांच्याकडे गेलो. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाऊन भेटलो. वेळ जातोय एकदा काय तो निर्णय घ्या, असं सांगितलं. 1 मेचा दिवस होता, मला बोलावून सांगितलं की सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असंही सांगितलं. 2 तारखेला कार्यक्रम होता, कुणाला काही माहिती नव्हतं, घरातील चार जणांना राजीनाम्याबाबत माहिती होतं.

    शरद पवारांनीच आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं, युवक आणि महिला आघाडीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर आंदोलन करायला सांगितलं होतं. तिथं काही जण आंदोलन करत होते, पण जितेंद्र आव्हाड सोडले तर तिथं एकही आमदार नव्हता. पण या आंदोलनाच्या निमित्ताने शरद पवारांनी राजीनामा मागं घेतला. पण त्यानंतर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा, असं सांगितलं. शरद पवारांची ही जी धरसोड सुरु होती, ती मला मान्य नव्हती.

    – आम्ही 2 जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर तो निर्णय आवडला नव्हता, तर शरद पवारांनी 17 जुलैला परत आम्हाला यशवंतराव चव्हाण सेंटरला का बोलावलं?? पहिल्यांदा मंत्री आणि आमदारांना बोलावलं त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आमदारांशी चर्चा करुन सगळं सुरळीत होणार असं सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं तेच सांगायचे.

    – तुम्ही आम्हाला गाफील का ठेवत होता?? एवढं सगळं झाल्यावर 12 ऑगस्टला रोजी मला एका उद्योगपतीनं जेवायला बोलावलं. तिथं जयंत पाटील, शरद पवार आणि मी असेन, असं त्या उद्योगपतीनं सांगितलं होतं. सगळं सुरळीत करायचं नव्हतं, तर कशा करता गाफील ठेवायचं??, असा परखड सवाल करून अजित पवार यांनी शरद पवारांचे पुरते वाभाडे काढले.

    Ajit pawar targets Sharad pawar, he kept all leaders in the dark while taking any decision!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस