विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत एकदम कळवळ आला. मुस्लिमांवर डोळे वटारणाऱ्यांना सोडणार नाही, अशी दमबाजी त्यांनी केली. पण राणे पिता-पुत्रांनी एका दणक्यात अजितदादांच्या दमबाजीचा चोळामोळा केला.
अजितदादांच्या राष्ट्रवादीने मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत अजितदादांचे छोटेखानी भाषण झाले. राज्यात शांतता त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे. हिंदू – मुस्लिम आणि अन्य सगळ्या समाजांनी सामंजस्याने एकत्र राहिले पाहिजे, असे अजितदादा म्हणाले. त्यापुढे जाऊन अजितदादांनी दमबाजी केली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि मुस्लिमांवर डोळे वटारणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नाही. माफ करणार नाही, असे अजितदादा म्हणाले. त्यावर तिथल्या उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
अजितदादांच्या दमबाजी बद्दल नारायण राणे यांना आज पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर नारायण राणे यांनी जबरदस्त टोला हाणला. अजितदादांनी काय डोळे चेक करण्याचा नवा व्यवसाय सुरू केलाय काय??, असा खोचक सवाल नारायण राणे यांनी केला.
त्यापुढे जाऊन राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीतल्या एका साहित्य विषयक कार्यक्रमामध्ये फटकेबाजी केली. मी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, आमदार किंवा मंत्री नंतर आहे, पण मी आधी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच माझी भूमिका मांडतो. त्यामध्ये काल फरक पडला नव्हता, आज फरक पडला नाही, आणि उद्याही फरक पडणार नाही, असे नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.
Ajit pawar targets Hindus, Rane duos targets Ajit Dada
महत्वाच्या बातम्या
- शिक्षणाचे खासगीकरण करून प्रायव्हेट कॉलेजेस काढली काँग्रेसच्या नेत्यांनी, पण आता राहुल गांधी + सुखदेव थोरातांनी वकालत केली पब्लिक एज्युकेशन सिस्टीमची!!
- JP Nadda ‘’लोकसभेतील अनेक खासदार ‘ओव्हर वेट’ आहेत, तपासणी झाली पाहिजे’’
- foreign jails : १० हजारांहून अधिक भारतीय परदेशी तुरुंगात; ४९ जणांना मृत्युदंड सुनावला गेला
- Amit Shah ‘३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल’