• Download App
    Ajit pawar आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; पण काकाने सांगितले, भावकीने पडता पडता वाचाविला!!

    आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; पण काकाने सांगितले, भावकीने पडता पडता वाचाविला!!

    नाशिक : आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; काकाने सांगितले भावकीने पडता पडता वाचविला!!, हे राजकीय सत्य सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या ईश्वरपुरातल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातून उघड्यावर आले.

    शरद पवारांची बहीण आणि एन. डी. पाटलांच्या पत्नी सरोजताई पाटील यांनी घेतलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, जयंत पाटील हे “पवार संस्कारित” नेते एकत्र आणले होते. या कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी देखील हजेरी लावली होती. त्यातच सगळ्यांची राजकीय जुगलबंदी रंगली. यावेळी केलेल्या स्वागत भाषणात सरोजताई पाटलांनी पवारांच्या घराणेशाहीची अफाट स्तुती केली. अजित पवार म्हणजे वरून नारळासारखे कठोर, पण आतून नारळाच्या पाण्यासारखे गोड, असे त्या म्हणाल्या, पण त्यापुढे जाऊन त्यांनी रोहित पवार हा पवार घराण्यातला उगवता तारा आहे, अशा शब्दांमध्ये वर्णन केले. रोहित पवार अलीकडे जोरदार भाषणे करू लागलाय. तो खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो. तो पवारांच्या घराण्याचा उगवता तारा आहे. तो एन. डी. पाटलांची जागा घेऊ लागलाय की काय, असे वाटायला लागले आहे, अशी स्तुतीसुमने सरोजताई पाटलांनी उधळली.



    मात्र त्यानंतर या उगवत्या ताऱ्याची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात किती केविलवाणी अवस्था झाली होती याचे वर्णन अजितदादांनी आपल्या भाषणात केले. अजित दादांनी भावकी पेक्षा गावकी कडे लक्ष दिले, असे रोहित पवार म्हणाले होते. त्यावर टोला हाणताना अजितदादांनी रोहित पवारांना पक्क्या शब्दांमध्ये सुनावले. तू जास्त चुरुचुरु बोलू नकोस. भावकीने लक्ष दिले म्हणून निवडून येऊन आमदार झालास. जयंतराव पाटलांना विचार तुला किती मत पडली होती, पोस्टल बॅलेट वर निवडून आलास, अशा शब्दांमध्ये अजितदारांनी उगवत्या ताऱ्याच्या कर्तृत्वाचे भर सभेत वाभाडे काढले.

    त्याआधी अजितदादांनी रोहित पवारांना आपल्या पक्षात काय चाललेय ते बघ इतरांच्या पक्षात नाक खुपसू नकोस. माझ्या तर नादालाच लागू नकोस, असा इशारा दिला होता. तोच इशारा त्यांनी ईश्वरपूर मधल्या सभेतही दिला. रोहित पवारांनी भाषण करताना सरोजताईंचा उल्लेख माई असा केला. वास्तविक त्या त्याच्या आजी आहेत. पण हा त्यांना माई म्हणतोय घरी गेल्यावर त्याच्याकडे बघतो, असा टोमणाही अजितदारांनी रोहित पवारांना हाणला.

    वाळवा तालुका सहजासहजी कुणापुढे वाकत नाही अशी टोलेबाजी जयंत पाटलांनी करून आपण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करणार नाही असे अप्रत्यक्षपणे सुचित केले.

    Ajit pawar target to Rohit pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : नकली को किया ढेर, UBT को पता चला कौन असली शेर; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन