• Download App
    Ajit pawar बापू पठारेंच्या मुलाला अजितदादांना सांगावे लागले, तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा!!

    बापू पठारेंच्या मुलाला अजितदादांना सांगावे लागले, तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा!!

    नाशिक : पुणे महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अजितदादांना तुतारीचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाला सांगावे लागले, की तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा आहे!!

    राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अजितदादांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी फक्त ‌पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे लागले. पवार काका – पुतण्यांना एकी दाखवावी लागली. त्यातही अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळात रोड शो करत फिरावे लागले.

    अर्थात अजित दादांनी हे सगळे रोड शो पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्येच काढले. कारण मुख्य पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची काहीच ताकद नाही आणि त्यांच्या रोड शो ला प्रतिसाद देखील मिळणार नाही, हे अजितदादांना माहिती होते. अजितदादांच्या रोड शो ला प्रत्येक ठिकाणी चांगलाच प्रतिसाद मिळाला, असे काही घडले नाही, पण त्यांना गल्लीबोळात फिरावे लागले, हे मात्र निश्चित!!



    – आक्रमक भाषा वापरायच्या नादात काढला बाप

    पण त्यापलीकडे जाऊन आक्रमक भाषा वापरण्याच्या नादात अजितदादांना भाजपच्या उमेदवाराचा बाप काढावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापू पठारे यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला भाजपमध्ये पाठवून महापालिका निवडणूक लढवायला लावली. सुरेंद्र पठारे यांच्या प्रभागात अजित पवारांनी सभा घेतली.

    त्यावेळी सुरेंद्र पठारे यांना सुनावताना तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा आहे, असे अजित पवारांना सांगावे लागले. काही लोक म्हणतात, 16 तारखेनंतर आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ. अरे, तू काय बघून घेतो माझ्याकडे, मीच सगळ्यांकडे बघणारा आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लै मोठा आहे, अशी दमदाटीची भाषा अजित पवारांनी केली. अजित पवार फारच घायकुतीला आलेत म्हणून ते तोंडाला येईल तसे बोलू लागलेत, असे टीकास्त्र भाजपच्या नेत्यांनी सोडले.

    Ajit pawar target to Bapu pathare

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!

    मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!

    29 महापालिका निवडणुका संपायच्या आत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा वाजला बिगूल; 5 फेब्रुवारीला मतदान 7 फेब्रुवारीला निकाल