विशेष प्रतिनिधी
पुणे : भोर तालुक्यातल्या बनेश्वर मधल्या 750 मीटरच्या रस्त्यासाठी 7 तासांचे खासदार सुप्रिया सुळे यांचे उपोषण आंदोलन गाजले. सुप्रिया सुळे त्यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवरून एकदम “हायपर लोकल” पातळीवर आल्या. पण अजित पवारांनी एकाच झटक्यात सुप्रिया सुळेंच्या त्या आंदोलनाची हवा काढून घेतली.
750 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलन कशाला करावे लागते?? प्रत्येक खासदाराला 5 कोटींचा निधी मिळतो. त्या निधीतल्या पैशांमधून तो रस्ता सहज बनवता आला असता, असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. अजितदादांचा हा टोला सुप्रिया सुळे यांच्या जिव्हारी लागला. त्यांना एकदम आपल्याला मिळत असलेला खासदार निधी आठवला, पण तो खूपच अपुरा असल्याची जाणीव त्यांना झाली. म्हणून त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
खासदारांना मिळणारा 5 कोटींचा निधी फारच अपुरा आहे. लोकसभेचे मतदारसंघ मोठे झालेत. बारामती लोकसभा मतदारसंघ नऊ तालुक्यांचा आणि 23 लाख मतदारांचा आहे. एवढ्या मोठ्या मतदार संघात 5 कोटी रुपये कसे पुरणार??, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. पण त्याच वेळी त्यांनी नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री पाटील नेहमीच मदत करत असल्याची पुस्ती आपल्या वक्तव्याला जोडली.
पण बनेश्वरच्या 750 साडेसातशे मीटर रस्त्यासाठी 7 तासांचे उपोषण आंदोलन करताना सुप्रिया सुळेंनी 5 कोटींच्या खासदार निधी विषयी चकार शब्द उच्चारला नव्हता. पण अजितदादांनी खासदार निधीकडे बोट दाखवताच, सुप्रिया सुळे यांना तो निधी अपुरा वाटायला लागला.
Ajit Pawar Supriya Sule war of words over MP funds
महत्वाच्या बातम्या
- घरामध्ये पवार दैवत, देशामध्ये मोदी मजबूत; अजितदादांच्या गुगलीने पवारांची राष्ट्रवादी घातली तंबूत!!
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ ; आप अन् भाजप आमदारांमध्ये हाणामारी
- Mamata Banerjee : ‘तुम्ही मला मारले तरी… बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही’
- Rafale maritime : भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करणार