प्रतिनिधी
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या वक्तव्यामुळे नव्हे तर खरोखरच धरणाच्या पाण्यात अडकले. कासारसाई धरणामध्ये मत्स्यव्यवसाय प्रकल्पला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. ते ज्या तराफ्यात बसले होते तो तराफा अधिकच्या वजनाने बंद पडल्याने अजित पवार पाण्यात मधोमध अडकून पडले. त्यानंतर दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने पवारांनी प्रकल्पाची पाहणी केली.Ajit Pawar stuck in dam, raft stuck in water
कासारसाई धरणामध्ये वेदिका फार्म म्हणून आधुनिक पध्दतीने मत्स्यव्यवसाय केला जातो. त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार शुक्रवारी (दि. ८) पहाटे सहा वाजता कासारसाई धरणावर आले होते. मत्स्यव्यवसायसाठी धरणाच्या मध्यभागी प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. तेथे जाण्यासाठी तराफा तसेच बोटीने जावे लागते,
परंतु संबधित मालकाने तराफ्याने जाण्याचे नियोजन केले. तराफ्यामध्ये आधिकची गर्दी करु नका म्हणून अजित पवारांनी तंबी दिली होती. परंतु पवार तराफ्यावर बसले आणि त्यानंतर मागून अधिकच्या काहींनी गर्दी केली. परिणामी जास्त गर्दीमुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते सुरु झाले नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली त्यानंतर पुढचा प्रवास करुन त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली.
कासारसाई धरणावर मत्स्यप्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास असलेला तराफा बंद पडल्याने ते पाण्याच्या मधोमध अडकून पडले होते.
Ajit Pawar stuck in dam, raft stuck in water
महत्त्वाच्या बातम्या
- Air Force Day : ‘ एअर फोर्स डे ‘ दिनानिमित्त बारावीनंतर महिला फ्लाइंग ऑफिसर बनू शकतात , कसे ते जाणून घ्या
- एसीबीने केली पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना अटक
- Cruise Ship Drug Party Case : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानचा जामीन फेटाळला, जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची सूचना
- फिलिपीन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर