विशेष प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडाफोडी फेटाळून लावली. पण त्यामुळेच शरद पवारांचे खासदार फुटणार, ही पुडी कुणी आणि का सोडली??, हा सवाल समोर आला. Ajit pawar statement
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या निवडक खासदारांशी संपर्क केला आणि त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. त्या बदल्यात भाजपने प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्री करण्याची तयारी दाखवली वगैरे बातम्यांच्या पुड्या दोन दिवसापासून सुटल्या होत्या. त्यात निलेश लंके, अमर काळे वगैरे खासदारांनी आपल्याशी थेट संपर्क झाला नसल्याचे सांगून संशयाला जागा ठेवली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करून शरद पवारांचे खासदार फुटणार नसल्याचा निर्वाळा दिला, पण या सगळ्यांमध्ये शरद पवारांचे खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीशिवाय राहू शकत नसल्याचा “राजकीय संदेश” सगळ्यात महाराष्ट्रात गेला.
त्यातच सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून झापल्याची बातमी काही मराठी माध्यमांनी चालवली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे विशिष्ट राजकीय महत्त्व प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा जास्त आहे असे ठसविण्यापलीकडे दुसरी काही नव्हते.
पण आधी सुनील तटकरे आणि नंतर अजित पवारांनी आज या संदर्भात सगळा खुलासा करून पवारांच्या खासदारांच्या फोडाफोडीच्या बातमीवर पाणी फेरले. सुनील तटकरे यांनी असा कोणाशी संपर्क केला नव्हता, असे स्वतः तटकरे आणि अजितदादांनी सांगितले. त्यामुळे पवारांच्या खासदारांचे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला लगेच येऊन बसण्याचे स्वप्न भंगले. पण दरम्यानच्या काळात अजितदादा दिल्लीवारी करून आले होते. त्यामुळे दिल्लीतूनच अजितदादांच्या किंवा पवारांच्या पक्षांची कुणी नस दाबली का??, यावर संशय तयार झाला. पण पवारांचे खासदार फुटायच्या बातमीची पुडी कुठून आणि कुणी सोडली??, यावर मात्र दोन्ही बाजूंनी उत्तर दिले नाही.
Ajit pawar statement
महत्वाच्या बातम्या
- Tirupati तिरुपतीत चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू; तिकिट बुकिंग काउंटरवर टोकनसाठी 4 हजार लोक होते रांगेत
- Congress : काँग्रेसला 1998 चा पचमढी ठराव अंमलबजावणीची “आयती” संधी; इंदिरा भवन मुख्यालयात जाऊन आखणार का रणनीती??
- Sheesh Mahal : ‘शीशमहाल तुमचे स्मशान बनेल’, दिल्लीच्या सीएम हाउसबाबत अनिल विज यांचं विधान!
- Delhi elections