विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : बापलेकीच्या वादामुळे गडचिरोलीतील राजकारण तापले आहे. यामध्ये मुलीला समजावण्याचा प्रयत्न अजित पवारांच्याच ( Ajit Pawar ) अंगलट आला. अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम ( Bhagyashree Atram ) यांनी थेटच सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्रामने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अहेरी विधानसभेत त्या वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसन्मान यात्रेनिमित्त गडचिरोलीचा दौरा केला असताना भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य केले होते.
आता भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार यांनी गडचिरोलीत येऊन मला ज्ञान शिकवत आहेत. तुम्ही इतके अनुभवी आहात. मग तुम्ही जेव्हा शरद पवारांना सोडून गेलात, तेव्हा घर फुटत आहे, हे तुम्हाला कळले नाही का? आज तुम्ही मला कोणत्या तोडांना सांगत आहात की, घर सोडू नका. आधी तुम्ही मान्य करा की, तुम्ही घर फोडले आहे. मी घर फोडून आलेले नाही. धर्मराव बाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी जेव्हा अपहरण केले होते, तेव्हा शरद पवारांनीच मध्यस्थी करून त्यांना सोडवले होते. शरद पवारांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहे. आज मी त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांची साथ सोडल्यानंतर मला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. दोन कपड्याच्या जोडीसह मी बाहेर पडले असून आता जनताच माझे भवितव्य ठरवेल, असेही भाग्यश्री आत्राम म्हणाल्या. आम्ही बाप-लेक एकत्र नाहीत. लोकांनी याबाबत गैरसमज बाळगू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवार भाग्यश्री आत्राम यांना उद्देशून म्हणाले होते की, तुम्ही तुमच्या वडिलांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना जिंकण्यासाठी मदत केली पाहिजे. कारण त्यांच्याकडेच या प्रदेशाचा विकास करण्याची क्षमता आणि दृष्टीकोन आहे. तसेच वस्ताद नेहमी एक डाव स्वतःकडे राखून ठेवत असतो, हे लक्षात ठेवा. समाज कधीही कुटुंबातील फूट स्वीकारत नाही. मी ही तेच अनुभवले आहे. मी माझी चूक मान्य केली आहे.
Ajit Pawar should not teach me knowledge, Bhagyashree Atram told directly
महत्वाच्या बातम्या
- “हिंदुत्व” सोडले म्हणून ठाकरेंना शिंदेंनी ठोकले; पण शिंदे सेनेचे “हिंदुत्व” बुरखे वाटपावर आले!!
- Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर
- Devendra Fadnavis : काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पाट्या जोरात; पण मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला गेले, तर मोठा गहजब!!
- Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या जामीन याचिकेवर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने म्हटले- सुनावणी खुल्या न्यायालयात होऊ शकत नाही