• Download App
    आंदोलनाबाबत चर्चा नाही, पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; अजितदादांशी चर्चेनंतर शाहू महाराजांचे वक्तव्य|ajit pawar - shahu maharaj meeting; thackeray govt postive about maratha reservation, says shahu maharaj

    आंदोलनाबाबत चर्चा नाही, पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; अजितदादांशी चर्चेनंतर शाहू महाराजांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. खासदार संभाजीराजे यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.ajit pawar – shahu maharaj meeting; thackeray govt postive about maratha reservation, says shahu maharaj

    या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शाहू महाराजांनी काही महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली. मराठा समाजाने आता सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार…ही ती वक्तव्ये होत.



    शाहू महाराज म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष असून ते या पुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. पण मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहायला पाहिजे. ती काळाची गरज आहे.

    सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे आवश्यक आहे. त्या निकालाचे मराठीत भाषांतर करुन तो निकाल समजून घेतला पाहिजे. कोर्टाचा अवमान होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

    शाहू महाराज म्हणाले, की केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिले आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करूनच तुम्हाला पुढचे पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितले पाहिजे. कायद्यात काय बसते हे सांगायला मी कायदेपंडित नाही.

    पण मराठा समाजासाठी जास्तीत जास्त काम करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटले तर कसे आणून देणार…??, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

    मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारऐवजी ते आता केंद्र सरकारकडे केंद्रीय कायदा बदलण्याचा आग्रह धरत आहेत. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची ही वक्तव्ये महत्त्वाची मानली जात आहेत.

    ajit pawar – shahu maharaj meeting; thackeray govt postive about maratha reservation, says shahu maharaj

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ