प्रतिनिधी
बारामती : Ajit Pawar जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार, शरद पवार एकत्र आल्याचे दिसले. मात्र, त्या कौटुंबिक सोहळ्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. काका-पुतण्यातील दरी कायम असल्याचे दिसून येत आहे. कारण तसे सूचक वक्तव्य अजित पवारांनी केले. ते म्हणाले की, काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. तसं केलं नाही तर पुढे काहीही चालतच नाही. अर्थात या वक्तव्यातील काका म्हणजे शरद पवार नसून आपले कार्यकर्ते काका कुतवळ असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.Ajit Pawar
अजित पवार रविवारी आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे जल पूजनासाठी आले होते. तीन दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, मी त्या एका रस्त्याबद्दल सहकार्य करा असं मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितलं आहे. आणि म्हणालो की, काकालाही विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही. या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. त्यावर लगेच ते म्हणाले की, हे काका म्हणजे काका कुतवळ. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल की दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत. भोर तालुक्यातील रस्त्यासाठी निधी मिळत नाही, असे सुप्रिया यांचे म्हणणे होते. तर खासदार निधीच्या पाच कोटींतून काम करता येईल. त्यासाठी आंदोलनाची गरज नाही, असे अजित पवारांचे म्हणणे होते.
पुरंदर विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही
अजित पवार म्हणाले की, विरोधक म्हणत होते की, निवडणूक झाल्यावर लाडकी बहीण योजना करतील. पण, तसे आम्ही केलं नाही. योजना सुरू ठेवली. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता, असं म्हणतात. कसा खाल्ला होता माहीत नाही, पण खाल्ला. पुरंदर विमानतळाचे काम हातात घेतले आहे. लोक विरोध करत आहेत. पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही. बदलते राहणीमान लक्षात घेऊन विमानतळ करणे भाग आहे.
Ajit Pawar said – Uncle, nothing will work unless he takes the people into his confidence.
महत्वाच्या बातम्या
- पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
- Ukraine : दावा- युक्रेनमधील भारतीय गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; युक्रेनने म्हटले- रशियाने मुद्दाम केले
- Trump : ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणकांना परस्पर शुल्कातून सूट दिली; लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल्सना सूट नाही
- Sukhbir Badal : सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले; 5 महिन्यांनी वापसी; तनखैया घोषित केले होते