प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आरोपीचा गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असेही ते म्हणाले. या प्रकरणी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतल्याने अजित पवारांनी सांगितले.Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस ठाण्यात साडेनऊ वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा सर्व बाजुने तपास चालू आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी हा शिरूर तालुक्यातील आहे. पोलिस शिरूर आणि गावपरिसरात आरोपीचा शोध घेत आहेत.
पालकमंत्री नात्याने या घटनेचा मनस्ताप
आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पुण्यातील घटनेसंदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत. सीसीटीव्हीच्या सगळ्या बारकाईने पोलिसांना पाहणी करण्यास सांगितले आहे. काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने या घटनेचा मनस्ताप आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि पुणेकरांना ही गोष्ट कुणालाच आवडलेली नाही, असेही अजित पवार म्हणाले. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचेही या प्रकरणाकडे लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल. आरोपी ताब्यात आल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर कशी आणि काय कारवाई करायची, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला कसा चालवता येईल, याबाबतची सर्व खबरदारी स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत. या प्रकरणात ज्या काही सूचना द्यायच्या त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांसह इतर सहकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला तातडीने अटक केली पाहिजे. त्याबद्दल पोलिस सर्व अँगलने तपास करत आहेत. यासाठी बरीच यंत्रणा कामाला लावण्यात आली आल्याचे अजित पवारांनी सांगितले.
स्वारगेट बस स्थानकातील सर्व सुरक्षा रक्षकांचे निलंबन
दुसरीकडे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वारगेट डेपो मधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांनी आदेश दिलेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.
Ajit Pawar said – There can be no other punishment for the accused in the Swargate rape case except death penalty
महत्वाच्या बातम्या
- फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु अडवाणींचे समाज सेवेसाठी योगदान अतुलनीय; मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिवादन
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला, लष्कराच्या वाहनावर गोळीबार
- Nitish Kumar : बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
- Kedarnath : चारधामबाबत मोठी बातमी ; केदारनाथ अन् बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडणार