• Download App
    Ram Shinde Accuses Ajit Pawar of Mental Torture अजित पवार 'ते' वक्तव्य करून मला टॉर्चर करत आहेत;

    Ram Shinde : अजित पवार ‘ते’ वक्तव्य करून मला टॉर्चर करत आहेत; विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा आरोप

    Ram Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Ram Shinde  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.Ram Shinde

    दहीहंडीनिमित्त बारामती दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना राम शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला. “अजित पवार शिळ्या कढीला ऊत का आणत आहेत?” असा सवाल करत त्यांनी, “हे वक्तव्य करून ते सातत्याने मला ‘टॉर्चर’ करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे म्हटले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अजित पवार यांनी रोहित पवारांना उद्देशून असेच वक्तव्य केले होते, आणि आता पुन्हा त्याचीच कबुली देत आहेत. अजित पवार राहून राहून सांगत आहे मी मदत केली, तर मी कसे म्हणणार मदत नाही केली, असे देखील राम शिंदे म्हणाले. असेही शिंदे म्हणाले.Ram Shinde



    महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करावी

    राम शिंदे पुढे म्हणाले, मी अधिक काही बोलणार नाही. मात्र मी या सगळ्याचा बळी ठरलो आहे. मी केवळ 622 मताच्या फरकाने पराभूत झालो आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार करुन अजित पवार मला टॉर्चर करत आहे. सातत्याने मला नाउमेद करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली पाहिजे.

    नेमके काय म्हणाले होते अजित पवार?

    इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.

    रोहित पवार यांनी व्यासपीठावरून पहिल्यांदा बोलताना दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरले असा टोला लगावला होता. यानंतर अजित पवार यांनी सुद्धा व्यासपीठावर बोलायला उभे राहिल्यानंतर रोहित पवारांच्या भावकीचा संदर्भ घेत चांगलाच पलटवार केला आणि माझ्या नादाला लागू नका, असा हसत हसत इशारा दिला. तसेच भावकीकडे लक्ष दिले म्हणून तू आमदार झालास. आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा असे म्हणत रोहित पवार यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार केला.

    Ram Shinde Accuses Ajit Pawar of Mental Torture

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजनांचा दावा; छगन भुजबळ म्हणाले – सात आमदार असताना आम्ही का मागे राहू?

    Sharad Pawar : शरद पवारांची कबुली- वसंतदादांचे सरकार आम्ही पाडले, त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले

    Praful Patel : प्रफुल्ल पटेल म्हणाले- 2014 मध्येच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेचा हात सोडायचे ठरले होते