विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या काळात अडवून धरलेले बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण झाल्याने काम वेगाने होऊन अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन लवकरच धावणार, बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन विकास संस्था आर्टी स्थापन करून आदिवासी विकास साधणार, तसेच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही असे म्हणत 40 तालुक्यांमध्ये तातडीच्या दुष्काळ निवारण उपाय योजना करणार घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केल्या. Ajit Pawar presented the interim budget of Maharashtra
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी 4 महिन्यांचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.
या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करणार, नगरविकास विभागासाठी 10 हजार कोटी, बांधकाम विभागासाठी 19 हजार 900 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटी दिले जाणार आहेत. ईस्टर्न फ्रीचा विस्तार ठाण्यापर्यंत केला जाणार आहे तर 18 लघुवस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार आहे.
- रेल्वे प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मार्च 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा होणार आहे. नवी मुंबई विमानतळ वर्षभरात सेवेत येणार आहे.
- संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. रात्रीचे उड्डाण घेण्यासाठी सेवा सुरु केली जाईल.
- शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे. 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. माझी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे. अंगवणवाड्यांना सौर उर्जा पुरवली जाणार आहे.
- वीज दर सवलतीत 1 वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. सौरपॅनल बसवण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे. आधुनिकीकरणामुळे 2700 मच्छिमारांना फायदा होणार आहे.
- मार्च 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. तर संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटी दिले जाणार आहेत.
- राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढला जाणार आहे.
- महिला बाल विकास विभागासाठी 3160 कोटी निधी देण्यात येणार आहे. ग्रामीण विभागात 1 कोटी 46 लाख नळजोडणी योजना आणण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांची 14 लाख पदे भरणार
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा. महिलांसाठी 5 हजार पिंक रिक्षा देणार
- ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरु करण्यात येणार आहे. बार्टीच्या धर्तीवर आर्टी संस्था उभी केली जाणार आहे. कुटुंबांना महत्वा फुले जनआरोग्य योजना देण्यात येणार आहे.
Ajit Pawar presented the interim budget of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी मंत्री भाजपमध्ये जाणार
- द फोकस एक्सप्लेनर : कसे होते राज्यसभेसाठी मतदान? किती आमदारांच्या मतांनी निवडून येतो खासदार? वाचा सविस्तर
- 28 फेब्रुवारी रोजी पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी, येथून प्रक्षेपित होणार छोटे रॉकेट
- जरांगेंना शिंदेंच्या कॅम्पमध्ये “ढकलून” पवार कॅम्पचा “अलिप्त” होण्याचा “बौद्धिक” प्रयत्न!!