• Download App
    Ajit Pawar अजित पवार : वादग्रस्त, पण अत्यंत कार्यक्षम नेत्याची अखेर!!

    अजित पवार : वादग्रस्त, पण अत्यंत कार्यक्षम नेत्याची अखेर!!

    अजित पवार आपल्या राजकीय कर्मभूमीत बारामती मध्येच विमान अपघातात कालवश झाले. एक अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याची अचानक political exit झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला. Ajit Pawar

    – परखड स्वभावाचा नेता

    अत्यंत कार्यक्षम आणि परखड स्वभावाचा नेता म्हणून अजित पवारांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जरी काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली झाली असली तरी त्यांनी लवकरच आपले स्वतंत्र राजकीय कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली. दहावीपर्यंत अपुरे शिक्षण असताना सुद्धा अजित पवारांनी आपल्या राजकीय बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्यातले अनेक प्रश्न समजून घेतले मंत्रिमंडळातल्या अनेक खात्यांचा अभ्यास करून त्या खात्यांमधल्या खाचा खोचा व्यवस्थित समजून घेतल्या त्यामुळे अजित पवारांना प्रशासनावर उत्तम मांड ठोकता आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण तयारी करून येणारा मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक झाला.

    अजित पवार 1991 मध्ये बारामतीतून खासदार झाले परंतु शरद पवार संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी बारामती लोकसभेची जागा सोडली आणि ते बारामतीतूनच आमदार झाले. सुरुवातीची काही वर्षे ते आमदार होते पण लवकरच ते सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यांनी जलसंपदासह वेगवेगळी खाती सांभाळली.

    – सत्तेशिवाय समाजकारण नाही

    विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी राजकीय कारकीर्दीत कधीच मागे वळून बघितले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेते पद सोडले, तर अजित पवार कायम “सत्ताधारी” राहिले. नुसते विरोधाचे तात्विक राजकारण करून चालणार नाही. समाजसेवा करायची असेल, तर सत्ता पाहिजे सत्तेशिवाय समाजसेवा नाही, हे यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले राजकीय सूत्र शरद पवार यांच्या पेक्षा अजित पवारांनी जास्त पाळले. त्यामुळे त्यांनी तब्बल चार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात उपमुख्यमंत्री पद सांभाळले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या चार मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना नेहमीच राजकीय दृष्ट्या सन्मान देत त्यांना बरोबर घेऊन कारभार केला.



    – 70000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप

    पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात जलसंपदा या विषयावरून गंभीर मतभेद झाले. जलसंपदा खात्यावर 70 हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा 1 % सिंचन होऊ शकले. त्यापलीकडे काही होऊ शकले नाही, असा ठपका थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा खात्यावर ठेवला. त्यावेळी अजित पवारांवर 70000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा पहिल्यांदा आरोप झाला. तो आरोप अखेरपर्यंत त्यांच्या पाठीला चिकटला होता. त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेतला 450 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप होता.

    – भाजपबरोबर सत्तेची सोबत

    या दोन्ही गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवारांना आपल्या सत्तेजवळ घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या मंत्रिमंडळात दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून स्थान दिले. पण त्यासाठी अजित पवार यांना आपले काका शरद पवार यांचा संपूर्ण पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन भाजपबरोबर यावे लागले.

    अजित पवारांची सुरुवातीची कारकीर्द जरी शरद पवारांच्या छत्रछायेखाली असली तरी त्यांनी लवकरच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. ज्यावेळी शरद पवारांच्या राजकीय वारसाचा प्रश्न आला त्यावेळी तो सुप्रिया सुळे यांनाच मिळणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार अस्वस्थ झाले होते. त्यामुळेच त्यांनी आपली स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. परंतु, राजकारणात एकटे पडण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी शरद पवारांबरोबर मतभेद व्यवस्थित मॅनेज केले आणि ते संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊनच भाजपबरोबर सत्तेमध्ये आले.

    – पार्थ पवारचा जमीन घोटाळा

    भाजपा बरोबर सत्तेमध्ये आल्यानंतर सुद्धा अजित पवारांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप दूर होऊ शकले नाहीत. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याबरोबरच, 450 कोटींचा राज्य सहकारी बँक घोटाळा, त्याचबरोबर पार्थ पवारचा मुंढवा कोरेगाव पार्क जमीन घोटाळा या घोटाळ्यांनी अजित पवारांची पाठ सोडली नाही. त्यामुळे अजित पवारांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. अजित पवार अत्यंत कार्यक्षम मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून वापरले तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ती कारकीर्द ग्रासत राहिली.

    Ajit Pawar Passed Away in plain accident

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजित पवारांचा आज दिवसभर कार्यक्रम काय होता??; बारामती तालुक्यात ते कुठे कुठे घेणार होते सभा??

    Ajit Pawar exit : एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावना!!

    Ajit Pawar exit : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे सोडून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित होईल??