• Download App
    Ajit Pawar NCP trapped in Prithviraj Chavan's Marathi prime minister statement पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे फडणवीस यांनी तोडले; पण पण मुख्यमंत्रीपदासाठी हावरट झालेली राष्ट्रवादी त्यात अडकली!!

    पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे फडणवीस यांनी तोडले; पण पण मुख्यमंत्रीपदासाठी हावरट झालेली राष्ट्रवादी त्यात अडकली!!

    Ajit Pawar NCP

    नाशिक : लवकरच मराठी पंतप्रधान होईल असे वक्तव्य करून पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे देवेंद्र फडणवीस यांनी तोडले, पण मुख्यमंत्री पदासाठी हावरट असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यात अडकली. हे राजकीय चित्र आज समोर आले.Ajit Pawar NCP trapped in Prithviraj Chavan’s Marathi prime minister statement

    अमेरिकेतल्या एपीस्टाईन फाईलच्या मुद्द्यावरून कुठलातरी बादरायणी संबंध जोडत पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच मराठी पंतप्रधान होईल, असे वक्तव्य केले होते. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता जाईल, असे त्यांना म्हणायचे होते. परंतु, ते त्यांनी स्पष्टपणे म्हटले नव्हते. त्या ऐवजी त्यांनी उलटा घास घेत लवकरच मराठी पंतप्रधान होईल, असे म्हणत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना मधाचे बोट लावले होते.



    प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज बाबांचा हा राजकीय डाव व्यवस्थित ओळखला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता काही बदलणार नाही. पृथ्वीराज बाबा म्हणतात तसा कुणी मराठी पंतप्रधान वगैरे होणार नाही, याची पक्की जाणीव देवेंद्र फडणवीस यांना असल्याने त्यांनी पृथ्वीराज बाबांनी लावलेल्या राजकीय जाळ्याला व्यवस्थित सुरुंग लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 40 वर्षाच्या माणसाला लाजवेल, एवढी कार्यक्षमता आजही आहे. त्यामुळे ते 2029 नंतर सुद्धा पंतप्रधान असतील, असे स्पष्ट वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. पृथ्वीराज बाबांना काय स्वप्न पाहिजे ते पाहू द्या, त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, असेही त्यांनी पृथ्वीराज बाबा आणि पत्रकारांना सुनावले.

    – अजितदादांची राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदासाठी हावरट

    पण पृथ्वीराज बाबांच्या या जाळ्यात मुख्यमंत्री पदासाठी हावरट असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अडकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीचे बडबोले प्रवक्ते आणि सध्याचे फक्त स्टार प्रचारक उरलेले अमोल मिटकरी यांनी लगेच पृथ्वीराज बाबांचे वक्तव्य “गांभीर्याने” घेतले. पृथ्वीराज बाबांचे वक्तव्य गांभीर्यानेच घेतले पाहिजे. देशात मराठी माणूस पंतप्रधान झाला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मोकळे होईल आणि त्या पदावर अजितदादा जाऊन बसतील, असा नेहमीचाच आशावाद अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

    – अजितदादा मुलाच्या लग्नात बहारीन मध्ये मग्न

    अखंड किंवा फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत कधीच बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने कधी आमदारकीची 100 री देखील गाठली नाही, तरी त्या पक्षाच्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची हाव कधी सुटली नाही, हेच मिटकरी यांनी उतावळ्या वक्तव्यातून दाखवून दिले. अजित पवार सध्या त्यांच्या मुलाच्या लग्नात बहारीनमध्ये मग्न आहेत. जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने पार्थला तिकडे नेऊन तिकडेच “सेटल” करण्याचा त्यांचा डाव असल्याचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पण पार्थ पवारचा जमीन घोटाळा अजितदादांचे उपमुख्यमंत्री पदच गिळंकृत करायला बसलाय, तरीही अमोल मिटकरी यांची अजितदादांना मुख्यमंत्री करायचे हाव काही सुटली नाही. तीच त्यांच्या ताज्या वक्तव्यातून समोर आली.

    Ajit Pawar NCP trapped in Prithviraj Chavan’s Marathi prime minister statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Putin : द फोकस एक्सप्लेनर : पुतिन यांची भारताला दोस्तीची हमी आणि पश्चिमेला बदलत्या शक्ती-संतुलनाचे संकेत

    Anjali Damania, : पार्थ पवारांवर FIR झाला की अजित पवारांचा राजीनामा नक्की; अंजली दमानियांचा दावा; नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणी महाजनांवर टीका

    Nitin Gadkari : गडकरी म्हणाले- एका वर्षात टोल बूथ संपतील; लोकसभेत सांगितले- बॅरियर-लेस प्रणाली लागू होईल; 10 ठिकाणी प्रायोगिक प्रकल्प सुरू