• Download App
    Ajit Pawar NCP to follow BJP, because they have no option तटकरे म्हणतात, दोन डिसेंबर नंतर सुद्धा राष्ट्रवादीची भाजपलाच साथ; त्यांना दुसरा पर्याय तरी आहे का??

    तटकरे म्हणतात, दोन डिसेंबर नंतर सुद्धा राष्ट्रवादीची भाजपलाच साथ; त्यांना दुसरा पर्याय तरी आहे का??

    Ajit Pawar NCP

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.Ajit Pawar NCP to follow BJP, because they have no option

    रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालचा प्रदेश भाजप आणि शिंदे सेना यांच्यात राजकीय संघर्ष उडाल्याच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केल्याचे बोलले गेले.

    पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत युती धर्माची भाषा वापरून संयमी भूमिका घेतली. त्यांना प्रवीण दरेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजप आणि शिंदे सेना यांनी एकमेकांचे पक्ष फोडून जे काही नेते आपापल्या पक्षांमध्ये ओढायचे ते ओढले आणि दोन डिसेंबरच्या मतदानापूर्वी युती धर्माची भाषा वापरून तडजोडीचे दरवाजे उघडे ठेवले.



    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही झाले तरी आपण भाजपबरोबर असल्याचा निर्वाळा दिला. 2 डिसेंबर नंतर रवींद्र चव्हाण काय निर्णय घेतील, ते माहिती नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजप पक्षाबरोबरच राहील, असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले.

    – दुसरा पर्याय आहे का??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते वेगवेगळ्या आरोपांच्या आणि घोटाळ्यांच्या चक्रात अडकले असताना भाजपने त्या पक्षाला सत्तेच्या वळचणीला आणून बसविले. त्यामुळे सत्तेची थोडीफार उब त्यांना लागली. ती सोडून इतरत्र जायचा हे नेते विचारही करू शकत नाही कारण त्यांनी तसा विचार केला तर घोटाळ्यांच्या चक्रात ते आणखी पिसून निघतील. याची पक्की जाणीव असल्यामुळे सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा बरोबर असल्याचा निर्वाळा दिला.

    Ajit Pawar NCP to follow BJP, because they have no option

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्ञान, साधना आणि संस्कृतीचा संगम ऋषभायन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मी लिपीत नाव!!

    World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!

    काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या काकांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीनीकरणाची वेळ, ती सुद्धा अमित शाहांच्या परवानगीने!!