• Download App
    Ajit Pawar NCP राष्ट्रवादीच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, आता पवारांचे कानावर हात; पण खरे कारण काय??

    राष्ट्रवादीच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, आता पवारांचे कानावर हात; पण खरे कारण काय??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, एवढेच शब्द बोलून तो विषय उडवून लावला. पण त्यातून राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुन्हा चर्चा ऐरणीवर आणली.

    मूळात शरद पवारांनी स्वतःच साधारण दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चेची पुडी सोडली होती. वास्तविक शरद पवारांनी ते वक्तव्य करण्याआधी तशी कोणती चर्चा देखील महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नव्हती. पण शरद पवारांनी आठ मे 2025 रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एकच आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, पण निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे असे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा विषय अचानक महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला. दरम्यानच्या काळात मोदी सरकारने निवडलेल्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले. त्यामुळे त्या मोदी सरकारच्या जवळ जात आहेत, या चर्चांना उधाण आले.



    – प्रफुल पटेल + सुनील तटकरे यांचा विरोध

    पण त्याच वेळी शरद पवार यांच्या वक्तव्यातला खरा धोका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा घडवून शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेच्या तुकड्यात आपला स्वतंत्र वाटा निर्माण करत आहेत, याची भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या, तरी भाजप सत्तेचा कोटा वाढवून देणार नाही. उलट अजित पवारांच्या कोट्यातलाच सत्तेचा वाटा कमी करून तो तुकडा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना देईल, याची खात्री पटल्याबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणास विरोध सुरू केला.

    प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्री पदाची आशा असताना अचानक एकीकरणाच्या चर्चेतून आपला पत्ता कट होईल आणि सुप्रिया सुळेंची मंत्रीपदी वर्णी लागेल याची भीती प्रफुल्ल पटेल यांना वाटली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी एखादा नवा स्पर्धक समोर येईल, याची भीती सुनील तटकरे यांना वाटली. त्यामुळे या दोघांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाला विरोध केला.

    या सगळ्याचा अंदाज शरद पवारांना आला. म्हणूनच त्यांनी आज बारामतीतल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या एकीकरणाबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे सांगून कानावर ठेवले. आपल्या एकीकरणाच्या प्रस्तावास अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सकारात्मक प्रतिसाद मिळतच नाही हे बघून शरद पवारांनी सध्या तरी तो विषय झटकून टाकला.

    Ajit Pawar NCP opposed NCP unification, therefore Sharad Pawar set aside his proposal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप