• Download App
    Ajit Pawar जिल्हा परिषद निकालांमध्ये शिंदे सेनेला मागे सारून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास; पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!

    जिल्हा परिषद निकालांमध्ये शिंदे सेनेला मागे सारून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास; पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!

    नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!, हेच राजकीय वास्तव जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी खरं म्हणजे समोर आणले. फक्त पवार बुद्धीच्या माध्यमांनी स्वीकारले नाही आणि दाखविले नाही. म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. Ajit Pawar

    महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या पण महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषदा असताना त्यापैकी फक्त बाराच जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात 36 जिल्हे असले तरी फक्त 34 जिल्हा परिषदा आहेत, कारण मुंबई शहर आणि मुंबई जिल्हा हे दोन संपूर्ण शहरी जिल्हे असल्याने त्यांच्या परिक्षेत्रात महापालिका आहेत. जिल्हा परिषदा नाहीत. त्यामुळे मुंबई सोडून इतर सर्व जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत. यापैकी फक्त 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यात.

    म्हणजे महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्याच नाहीत. पण 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सगळ्याच जिल्हा परिषद मध्ये सत्ता आणली. या जिल्हा परिषदांच्या निकालांची जी आकडेवारी समोर आली त्यानुसार बारा जिल्हा परिषदांमधील 731 जागांपैकी 23 भाजप, 167 अजित पवार राष्ट्रवादी, 162 शिंदे सेना अशी विभागणी झाली. त्यामुळे अर्थातच शिंदे सेनेला मागे सारून अजित पवारांचे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आली, असा भास निर्माण झाला. जिल्हा परिषदेत पाच सदस्य जास्त निवडून आले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे सेनेची पिछेहाट करून अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आली अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.



    – महापालिका, नगरपरिषदांमध्ये शिंदे सेना दुसऱ्या नंबर वर

    पण वास्तवात 34 पैकी फक्त बारा जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे सेनेपेक्षा फक्त 5 जिल्हा परिषद सदस्य जास्त निवडून आणले म्हणून सगळ्या महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आणि शिंदे सेनेची ताकद त्यांच्या तुलनेत घटली, असे म्हणण्यात काहीच मतलब नाही. कारण महापालिका आणि नगरपरिषदा या दोन्ही निवडणुकांमध्ये शिंदे सेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत कितीतरी आघाडीवर राहिली. नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपने 123 नगरपरिषदा जिंकल्या, तर शिंदे सेनेने 53 नगर परिषदा जिंकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 36 नगर परिषदा जिंकण्यात यश मिळाले. म्हणजे नगरपरिषदांच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्याच क्रमांकावर राहिली.

    – पुणे आणि पिंपरी चिंचवड गमावले

    महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप पहिला नंबर वर राहिला. 29 पैकी 24 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली. त्यामध्ये फक्त एका महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर पद मिळू शकले. शिंदे सेनेला चार महापालिकांमध्ये महापौर पद मिळाले उरलेल्या सगळ्या महापालिकांमध्ये भाजपने आपला महापौर केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सुद्धा महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची कामगिरी फिकीच राहिली. उलट पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या बालेकिल्ल्यांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपने दारुण पराभवाचा दणका दिला.

    – वस्तुस्थिती वेगळीच

    त्यामुळे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांचा निकाल पाहता भाजप एक नंबर वर राहिला. शिंदे सेना दोन नंबर वर राहिली, तर अजित पवारांचे राष्ट्रवादी तिसऱ्याच क्रमांकावर राहिली. केवळ 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेनेपेक्षा 5 सदस्य जास्त निवडून आणल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान एकदम उंचावले आणि शिंदे सेनेला त्या पक्षाने मागे सारले, असे समजायचे काही कारण नाही. कारण ती वस्तुस्थिती नाही. उलट शिंदे सेनेने महायुतीत चांगला “स्ट्राईक रेट” राखून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या जनतेने अजित पवारांच्या पेक्षा जास्त स्वीकारले, हेच दाखवून दिले.

    Ajit Pawar NCP is no. 2 is political myth

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड कडून 15000 कोटींच्या कर्जासह फडणवीस सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय

    Manipur Violence : मणिपूरच्या लितानमध्ये हिंसाचार उसळला, 25 घरे जाळली; दंगलखोरांनी रायफलींनी गोळीबारही केला

    जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल संशय – संदेह; तितके राष्ट्रवादीचे विलीनीकरण दूरच दूर!!