• Download App
    Ajit Pawar NCP कोर्टात + माध्यमांमध्ये "पवार संस्कारितांचे" रोज निघताहेत वाभाडे; तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

    कोर्टात + माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघताहेत वाभाडे; तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

    वैष्णवी हगवणे प्रकरणात कोर्टात आणि माध्यमांमध्ये पवार संस्कारितांचे रोज वाभाडे काढले जात आहेत. हगवणे परिवाराचा वकीलाने कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यामुळे संतापलेल्या कस्पटे परिवाराने पत्रकार परिषद घेऊन हगवणे परिवाराची सगळी काळी कृत्ये बाहेर काढली. हगवणे परिवाराला चांदीच्या गौरी दिल्या. फॉर्च्यूनर गाडी दिली तरी त्यांची हाव संपली नाही. आता वैष्णवी नसताना तिच्या चारित्र्यावर हगवणे परिवाराचा वकील शिंतोडे उडवतोय, असा आरोप वैष्णवीचे वडील कस्पटे यांनी केला. हगवणे परिवाराकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, ते कशाला फॉर्च्युनर गाडी मागतील??, अशी मखलाशी हगवणे परिवाराच्या वकिलाने केली.



    या सगळ्या प्रकरणावरून अजित पवारांनी जरी हात झटकले असले तरी हगवणे परिवार पवार संस्कारित होता. अखंड राष्ट्रवादीत पवारांचे आशीर्वाद त्या परिवाराच्या डोक्यावर होते. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्याबरोबर हगवणे परिवाराचे फोटो झळकले होते ही बाब माध्यमांनी उघड्यावर आणली. फॉर्च्यूनर गाडीची तर चावी अजित पवारांच्या हस्ते वैष्णवीच्या नवऱ्याला देण्यात आली होती. त्याचे फोटोही माध्यमांनी झळकविले. हगवणे परिवाराने पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर याच्या नावाने कस्पटे परिवाराला धमकी दिली होती अखेरीस महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने जालिंदर सुपेकर यांच्या हातातला तीन जेलचा कारभार काढून घेतला. हगवणे परिवार गेली 20 वर्षे तरी पवारांच्या संस्कारांखाली आणि आशीर्वादाने राष्ट्रवादीचेच काम करत होता. पवारांचे हे सगळे “संस्कार” माध्यमांनी पुरते उघड्यावर आणले.

    – बाबासाहेब पाटलांचे वक्तव्य

    एकीकडे पवारांचे संस्कार जरी उघड्यावर आले असले तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाचे धुमारे फुटले. वास्तविक भाजपने बहुमतासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीची गरज नसताना अजितदादांना स्वतःच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसू दिले आहे, तरी देखील मित्र पक्षांमध्येच काड्या घालण्याची अजितदादांची जुनी सवय गेली नाही. ती भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसूनही पुन्हा उफाळून आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादा हे कधी ना कधीतरी मुख्यमंत्री होतील. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. ते मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचे प्रगती होईल, असे वक्तव्य केले. महायुती तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही अजितदादांच्या पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाची हाव सुटली नाही.

    Ajit Pawar NCP is missing out on the Chief Minister’s post.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!