नाशिक : आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!, अशी चिन्हे खरंच दिसून राहिली आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारनामेच तसे चालवले आहेत.Ajit Pawar NCP despicable to defeat BJP in Nagpur
151 नगरसेवकांच्या महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कुठलीही ताकद नाही राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना देखील नागपूरमध्ये त्या पक्षाची फारशी ताकद नव्हतीच. कारण राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाची ओळखच मूळात पश्चिम महाराष्ट्रातला उपप्रादेशिक पक्ष अशी राहिली. शरद पवार आणि अजित पवार हे आपल्या पक्षाची फार मोठी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण करू शकले नाहीत. तरीदेखील भाजपने गरज नसताना अजित पवारांना महायुतीमध्ये स्थान दिले. त्यांना उपमुख्यमंत्री केले. पण आता त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नागपूर महापालिकेत भाजपचे उमेदवार पाडायची तयारी चालवली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नागपूर महापालिकेत आपल्याला 40 जागा मिळाव्यात, अशी मागणी भाजपकडे केली. त्यावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी अंथरूण पाहून पाय पसरावेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना तो सल्ला बोचला. म्हणून त्यांनी स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी चालवली. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यातून याची प्रचिती आली. आमचे अंथरूण आणि आमचे पाय हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना आहे ते ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल प्रशांत पवार यांनी संदीप जोशी यांना केला, पण त्यापलीकडे जाऊन आमच्याकडे नागपूर मध्ये लढवण्यासाठी 151 उमेदवार आहेत. ते उभे करू ते सगळेच्या सगळे हरले, तरी यात आम्हाला गमावण्यासारखे काही नाही आमचे नुकसान काही नाही पण भाजपचे मात्र नुकसान करू, अशी दमबाजी प्रशांत पवार यांनी केली.
नागपूर मध्ये भाजपचे 108 नगरसेवक होते आमचा एकही नगरसेवक नव्हता तरीदेखील भाजपने 50% नगरसेवक बदलायचे ठरवले आहे. याचा अर्थ त्यांच्या आधीच्या नगरसेवकांनी कामच केले नाही, हे त्या पक्षाला मान्य आहे, असा दावा प्रशांत पवार यांनी केला.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळून व्यवस्थित बहुमत मिळाले तरी देखील गरज नसताना भाजपच्या नेतृत्वाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत जोडून घेतले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आयती सत्ता हातात मिळाली. त्याबरोबर आधीच मस्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणखी मस्ती चढली. ज्या भाजपने राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला घेतले, त्या भाजपलाच टांग द्यायची मस्ती अजितदादांच्या राष्ट्रवादीने चालवली. अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही मस्ती वेळीच आवरली नाही तर भाजप अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नागपूर मधल्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिलाय.
Ajit Pawar NCP despicable to defeat BJP in Nagpur
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने घेतला मोठा निर्णय
- Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू – २९० भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी इराणहून दिल्लीला पोहोचली
- Omar Abdullah : ‘अमेरिका एखाद्या मित्र तोपर्यंतच राहतो, जोपर्यंत…’ ; उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा
- Israel : इस्रायलने इराणच्या “इस्फहान अणुऊर्जा केंद्रावर” केला मोठा हल्ला