• Download App
    Ajit Pawar अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??

    अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??

    नाशिक : अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय. Ajit Pawar

    अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे बारामतीतच त्यांच्या स्मृतींचे संग्रहालय बांधावे, असे मत अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवार याने व्यक्त केले, तर अजित पवारांचे पुण्यावर प्रेम होते पुण्याचा विकास आराखडा तयार करण्यात त्यांचे योगदान होते त्यामुळे त्यांचे स्मृती संग्रहालय पुण्यात बांधावे असे मत जय पवार याने व्यक्त केले. त्यामुळे अजितदादांच्या स्मृती संग्रहालयाच्या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये मतमतांतरे आणि मतभेद झाल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दिली.



    – सगळे काही पवारांच्याच कब्जात

    पण पवारांच्या घरातले मतभेद आणि मतमतांतरे याचे रूपांतर पवारांच्याच वेगळ्या प्रकारच्या कब्जात होते, हा आतापर्यंतचा राजकीय अनुभव आहे. बारामतीत ज्यावेळी निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळी अजित पवारांनी बाकी कुणाला नावे तर सुनेत्रा पवार यांनाच निवडणूक लढवण्यासाठी पुढे केले त्यामुळे बारामतीच्या खासदार पदी कोणीही निवडून येवो, खासदार पवार घराण्यातल्याच होईल हे या निमित्ताने पाहिले गेले. त्याचेच रिपीटेशन विधानसभा निवडणुकीत झाले अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी लढत झाली. या लढतीत अजित पवार जिंकले पण युगेंद्र पवार जिंकले असते, तरी बारामतीची आमदारकी पवारांच्याच घरात राहिली असती. आता सुद्धा अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे??, त्यासाठी विलीनीकरण करायचे आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे असा डाव शरद पवारांच्या गोटाने खेळला. पण सुनेत्रा पवारांचे नेतृत्व पुढे आले किंबहुना ते आणले गेले. त्यातून सुद्धा पवारांच्याच घरात नेतृत्व गेले ते इतरांच्या पैकी कुणाकडेही गेले नाही.

    – मतभेदांच्या नावाखाली दोन संग्रहालये

    पवारांच्या राजकारणाचे हे तीन ताजे अनुभव पाहता, अजित पवारांच्या स्मृती संग्रहालयावरून दोन भावांमध्ये मतभेद असल्याचे दाखवले गेले तरी या मतभेदाच्या नावाखाली पुणे आणि बारामती अशा दोन्ही ठिकाणी अजित पवारांचे स्मृती संग्रहालय बांधायचा घाट तर घातला जात नाही ना??, असा संशय राजकीय वर्तुळातून कुणी व्यक्त करत असल्यास तो अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. उलट या वादाचे निमित्त करून अजित पवारांच्या स्मृती संग्रहालयाचा विषय सार्वजनिक पातळीवर चर्चा ठेवायचा आणि राजकीय वर्तुळातूनच दोन संग्रहालय बांधण्यासाठी सरकारवर दबाव आणायचा असले राजकारण यातून पवार कुटुंब खेळत असण्याचीही दाट शक्यता आहे.

    Ajit Pawar museum in Pune and Baramati??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- ‘राष्ट्रवादी’चे विलीनीकरण झाले तर बोलणार; हवेत पतंगबाजी का करायची?

    Ranveer Singh : रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी; व्हॉट्सॲप व्हॉइस नोट पाठवून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली

    Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाला- रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त