• Download App
    Ajit Pawar left alone in BJP mahayuti महायुतीत अजितदादा एकाकी; राष्ट्रवादीचा होणार political size कमी!!

    महायुतीत अजितदादा एकाकी; राष्ट्रवादीचा होणार political size कमी!!

    Ajit pawar

    नाशिक : महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका होत असताना महायुतीत अजितदादा एकाकी, राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार political size कमी!!, असे राजकीय चित्र निवडणुका जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी समोर आले. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुद्दामून समोर आणले.Ajit Pawar left alone in BJP mahayuti

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय पोपटाचे प्राण ज्या दोन महापालिकांमध्ये अडकलेत, त्या पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून दूर सारले. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याची तथाकथित मुभा ठेवली, पण हे करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीत मात्र राजकीय पाचर मारून ठेवली.



    पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र लढू शकणार नाहीत. आम्ही एकत्र लढलो तर त्याचा लाभ तिसऱ्याला होईल, हे आम्हाला माहिती आहे. तेवढे राजकारण आम्हाला कळते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पण त्याच वेळी सगळीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी भाजपची युती होईल, असेही त्यांनी जाहीर केले. या वक्तव्यातून फडणवीस यांनी महायुतीतून अलगदपणे अजित पवारांना बाजूला काढले.

    – भाजपला अजितदादांची नाही गरज

    कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड वगळता बाकी कुठल्याही महापालिकांमध्ये भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गरज नाही. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच काय, पण अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अखंड राष्ट्रवादीची सुद्धा महाराष्ट्रातल्या महापालिका परिक्षेत्रांमध्ये फारशी कधी ताकदच नव्हती आणि आजही तशी ताकद नाही. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीची भाजपला ना गरज आहे ना फायदा, त्यामुळे फडणवीसांनी अतिशय चतुराईने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतून बाजूला काढून टाकले. मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिक आहेत नवाब मलिक आम्हाला नकोत असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगून टाकले आहे. त्यामुळे मुंबईतल्या महायुतीत अजित पवारांचे राष्ट्रवादी तशीही बाजूलाच टाकली गेली आहे.

    – अजितदादांची घसरेल कामगिरी

    या सगळ्याचा एकूण व्यापक परिणाम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या political size वर होणार आहे. तसाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा political size महायुतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही performance होईल, त्यामध्ये अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा काही विशिष्ट वाटा धरला, तरी तो एकूण performance साडेतीन किंवा पावणेचार क्रमांकाचा राहील किंवा अगदी तो चौथ्या क्रमांकावर सुद्धा घसरू शकेल. याचा अर्थच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा political size साईज कमी होईल. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीत bargaining power तशीही कमीच होती. ती आणखी कमी होईल. याचा दीर्घकालीन लाभ भाजपला होईल. पवार नावाच्या factor चा political presence घटला, तर तो भाजपला हवाच आहे.

    – कारण अजितदादांचे हात दगडाखाली

    पण या सगळ्याला भाजप पेक्षा खुद्द अजित पवारच कारणीभूत ठरलेत. कारण त्यांचे हात पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यासकट विविध घोटाळ्यांच्या दगडाखाली अडकलेत. पार्थ पवारला वाचवायचे असेल, तर भाजपचे नेतृत्व सांगेल, तसे वागावे लागेल. अन्यथा भाजप वेगळ्या पद्धतीने पार्थ पवारला अडकवेल आणि त्याची राजकीय किंमत अजित पवारांना चुकवावी लागेल. याची पक्की जाणीव अजितदादांना आहे. शिवाय त्यांच्या पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे “वेगळा” विचार करू शकणारे नेते, तर अजितदादांसाठी “अस्तनीतले निखारे” बनलेत. याची जाणीव रोहित पवारांनी अजितदादांना करून दिली होती, पण ती जाणीव होऊन सुद्धा अजितदादा काही करू शकत नाहीत. कारण त्यांचे हात खऱ्या अर्थाने दगडाखाली अडकलेत.

    Ajit Pawar left alone in BJP mahayuti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

    महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी!!

    स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…स्वराज्याचा स्वाभिमान; इचलकरंजीत शंभू तीर्थ चौकात पुतळ्याचे अनावरण