विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सपाटून मार खाल्ला असला तरी अवघ्या 4 महिन्यांमध्ये अजितदादांनी महायुतीमध्ये राहून आपल्या काकांवर मात करून दाखविली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ECI अर्थात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तळातून पहिली आली आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष सुद्धा 17 जागांवर आघाडीवर आहेत, तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 11 जागांवर आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर नमूद केले आहे.अजितदादांची राष्ट्रवादी 37 जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी फक्त राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर फक्त 5 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी फक्त सुनील तटकरे रायगड मधून निवडून आले. खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.
त्या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 48 पैकी फक्त 10 जागा लढवून लोकसभेत 8 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवारांनी त्यानंतर आपला स्ट्राईक रेट कसा भारी आहे याचे गेल्या 4 महिन्यांत अनेकदा वर्णन केले होते. मराठी माध्यमांनी देखील पवार किती “भारी” आहेत, याचे बहारदार वर्णन चालविले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत सगळे चित्र उलटेपालटे झाले. अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवर आघाडीवर आली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी तळातून पहिली येत फक्त 11 जागांवर आघाडीवर राहिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पुतण्याने काकावर मात केली.
Ajit Pawar lead sharad pawar in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- AAP : ‘आप’च्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 11 पैकी भाजप-काँग्रेसचे सहा बंडखोर
- Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणतात, अदानींनी 2000 कोटींचा घोटाळा केला
- Pakistan : पाकिस्तानमध्ये प्रवासी वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार ; 38 जणांचा मृत्यू
- Jharkhand : झारखंडच्या 38 जागांवर 68.45% मतदान; JMM आमदार आणि भाजप समर्थकांमध्ये धक्काबुक्की