• Download App
    पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा निघण्यापूर्वीच अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा तिला गुलाबी छेद Ajit pawar jansanman yatra

    Ajit pawar : पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा निघण्यापूर्वीच अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा तिला गुलाबी छेद!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा निघण्यापूर्वीच महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढून तिला छेद दिला आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची घोषणा कालच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली होती ही यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून निघून राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्ये फिरणार आहे. Ajit pawar jansanman yatra

    पण पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा निघण्यापूर्वीच अजित पवारांनी जय्यत तयारीनिशी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदार संघातून जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या स्वागतासाठी शरद पवारांचे निष्ठावंत श्रीराम शेटे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या श्रीराम शेटे यांनी पवारांची साथ सोडून अजित दादांना साथ दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीतले सत्ता संतुलन बिघडल्याचे सांगितले जात आहे.

    दिंडोरीतून अजित दादांनी काढलेल्या जनसमान यात्रेत सगळीकडे गुलाबी वातावरण होते गुलाबी जॅकेट गुलाबी गाड्या आणि त्यावर प्रामुख्याने शिंदे – फडणवीस सरकारने काढलेल्या महिलांसाठीच्या सन्मान योजनांचे, लाडकी बहीण योजनांचे मोठमोठे स्टिकर्स आणि बॅनर त्यावर लावले होते. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या योजनेचे सगळे श्रेय अजितदादाच घेऊन जातात की काय??, अशी चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुलाबी रंग धारण केला आहे. त्यातून त्यांची नवी प्रतिमा निर्मिती करण्याचा राष्ट्रवादीचा एका एजन्सी मार्फत प्रयत्न सुरू आहे. जनसन्मान यात्रेत याच गुलाबी रंगाचे प्रतिबिंब सर्वत्र पडलेले दिसले. अजितदादा आता कायमचा गुलाबी जॅकेट मध्ये असतात पण आता त्यांचे सगळे समर्थकही गुलाबी जॅकेट घालून जनसन्मान यात्रेत सहभागी झाले.



    पण अजितदादांच्या राष्ट्रवादीने धारण केलेला गुलाबी रंग भारताच्या राजकारणात नवीन नाही. तेलंगणामध्ये के. सी. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा रंगही गुलाबीच आहे. मात्र, या गुलाबी रंगाचा तेलंगणाच्या जनतेवर फारसा अनुकूल परिणाम झाला नव्हता. चंद्रशेखर राव यांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कडून पराभव पत्करावा लागला होता.

    ते काहीही असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा निघण्यापूर्वी अजितदादांनी आता जनसमान यात्रा काढून तिला छेद दिला. अजितदादांच्या राष्ट्रवादी वर गुलाबी रंगाचा प्रभाव आहे. अजितदादा पुढचे चार दिवस नाशिक जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघांमध्ये जनसन्मान यात्रेतून फिरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला बळकटी आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या यात्रेत अजितदादांना राष्ट्रवादीतल्या कुठल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समर्थन मिळते आणि ते पुढच्या भविष्यात किती उपयोगी ठरते??, हे आगामी काळ सांगणार आहे.

    Ajit pawar jansanman yatra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस