• Download App
    Ajit pawar अजितदादा सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा पवारांचा खुलासा; दिला ईडी + सीबीआयचा हवाला!!

    Between the lines : अजितदादा सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा पवारांचा खुलासा; दिला ईडी + सीबीआयचा हवाला!!

    नाशिक : शरद पवारांची राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती एकाच वेळी विरोधी पक्षात आणि त्याचवेळी सत्ताधारी वळचणीला ही बाब नवीन नाही. त्याचाच पुनरुच्चार शरद पवारांनी आज वेगळ्या पद्धतीने केला. छगन भुजबळ यांनी नाकारल्यानंतर देखील पवारांनी ईडी आणि सीबीआयचा हवाला दिला. त्याचवेळी त्यांनी अजित पवार सत्तेची वळचण सोडून आपल्याकडे येतील असे वाटत नसल्याचा दावा केला. Ajit pawar

    महाराष्ट्रात निवडणुकीनंतरच्या समीकरणांमध्ये अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार अशा बातम्यांच्या पुड्या अजित पवारांच्याच गोटातले नेते नवाब मलिक आणि दिलीप वळसे पाटील यांनी सोडल्या. त्यावर स्वतः अजितदादांनी सावध पवित्रा घेत कुठलेही भाष्य करायचे टाळले. मात्र, मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवार सत्तेची वळचण सोडून आपल्याबरोबर येतील, असे वाटत नसल्याचा खुलासा केला. केंद्रात जोपर्यंत मोदींची सत्ता आहे, तोपर्यंत अजित पवार आपल्याबरोबर येऊ शकणार नाहीत, असे पवार म्हणाले. पवारांनी केलेल्या खुलाशामध्ये बरेच “बिटवीन द लाईन्स” दडले आहे.


    Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?


    शरद पवारांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. त्या पुस्तकांमध्ये छगन भुजबळांच्या मुलाखतीच्या आधारे राजदीप सरदेसाई यांनी वेगवेगळे दावे केले. ईडी + सीबीआय यांच्या दबावापोटीच अजितदादांना भाजपबरोबर जाणे भाग पडले. अन्यथा सुनेत्रा पवारांना जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्या प्रकरणात अटक झाली असती. त्यावेळी अजितदादांना घाम फुटला होता. प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रिंग केले. त्यामुळे त्यांच्या सीजे हाऊसचे 4 मजले ईडीने सील केले. त्यामुळे त्यांचेही मत भाजपबरोबर जायला अनुकूल झाले. आम्ही सगळे पवारांकडे गेलो. परंतु, त्यांनी आमचे विनंती भेटून लावली म्हणून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर निघून गेलो, वगैरे दावे भुजबळांनी मुलाखतीत केल्याचे राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात लिहिले.

    या संदर्भातल्या बातम्या आल्यानंतर भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्या पुस्तकातले सगळे दावे फेटाळून लावले. उलट राजदीप सरदेसाईंवर कायदेशीर कारवाईचा ऑप्शन खुला केला.

    मात्र, शरद पवारांनी त्याच पुस्तकाचा हवाला देऊन ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटीच अजित पवार भाजपच्या सत्तेची वळचण सोडून आपल्याकडे येणार नाहीत, असा दावा केला.

    – बिटवीन द लाईन्स

    या सगळ्यातले “बिटवीन द लाईन्स” असे, की सत्ता काळात अजित पवार असोत, छगन भुजबळ असोत की प्रफुल्ल पटेल, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आणि आपापल्या पातळीवर भ्रष्टाचार केला. त्यामुळे भाजपच्या राजवटीत त्यांना ईडी + सीबीआय कारवाईची भीती वाटली. ते शरद पवारांकडे मदत मागायला गेले. परंतु, शरद पवार त्यांना मदत करू शकले नाहीत. म्हणूनच त्यांना भाजपच्या सत्तेचा वळचणीचा मार्ग स्वीकारावा लागला. हे सगळे शरद पवारांच्या मुक संमतीने झाले. शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेसह विरोधी पक्षात राहिले आणि अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून आले. आता अजितदादांना सत्तेची वळचण सोडणे शक्य नाही. कारण केंद्रामध्ये मोदींचे सरकार आहे आणि मोदींचे सरकार तिथे असेपर्यंत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ईडी + सीबीआय कारवाईच्या भीतीमधून “सुटका” नाही, असेच शरद पवारांनी खुलेपणाने मुंबई तकच्या मुलाखतीत सांगितले.

    Ajit pawar in fix, in Modi power grip!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस