• Download App
    बटन दाबा कचाकचा, चौकशीला सामोरे जा पटापटा!!; अजितदादांना वक्तव्य भोवले Ajit pawar has to face legal inquiry of election commission over his controversial remarks

    बटन दाबा कचाकचा, चौकशीला सामोरे जा पटापटा!!; अजितदादांना वक्तव्य भोवले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हाय प्रोफाईल लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना आश्वासन देताना एक वादग्रस्त विधान केले होते. तुम्ही घड्याळ चिन्हासमोरचे बटन कचाकचा दाबा, नाहीतर निधी देताना माझा हात आखडता होईल, असे अजितदादा म्हणाले होते. अजितदादांच्या या वक्तव्यावर आता तक्रार झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अजितदादांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. Ajit pawar has to face legal inquiry of election commission over his controversial remarks

    काय म्हणाले अजित पवार?

    इंदापूर मध्ये वकील व्यापारी संघटनेच्या मेळाव्यात अजितदादांचे भाषण झाले त्यावेळी अजित दादा म्हणाले होते, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचाकचा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा पण हात आखडता येईल, असे म्हणतातच सभेमध्ये अशा पिकला. अजित दादांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमधून आणि सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला, पण त्यामुळे अजितदादांचे विरोधक चिडले आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेऊन अजितदादांच्या वक्तव्याच्या चौकशीची मागणी केली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी अजितदादांच्या त्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.



    अजित पवारांचा डॉक्टरांनाही सल्ला

    इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टरांची संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी डॉक्टरांना हसत हसत एक सल्ला दिला. तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा. कसं काय जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर त्यांना चांगली वागणूक द्या आणि दुसर नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. असं म्हणतात एकच हशा पिकला त्यावर अजित पवारांनी सावरून घेत सॉरी माफ करा असं म्हटलं.

    ‘नाहीतर द्रौपदीसारखं करावं लागेल’

    मुलींचा जन्मदर कमी होत असल्याबद्दलही अजित पवार यांनी चिंता केली. पण हे सांगत असताना त्यांनी भलतंच उदाहरण दिलं. मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं करावं लागतंकी काय अशी भीती वाटते, असं अजित पवार म्हणाले होते.

    अजित पवारांच्या या वक्तव्यांवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहे त्यामुळे निवडणूकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का??, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. विरोधकांनी अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

    Ajit pawar has to face legal inquiry of election commission over his controversial remarks

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ