प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालवले अजितदादांच्या समर्थकांनी पोस्टर्स वर “भावी मुख्यमंत्री” असे लिहिले. इतकेच नाही, तर अजितदादांबरोबर शपथ घेतलेले मंत्री अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, अमोल मिटकरी यांनी अजितदादा लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असेही म्हटले. Ajit pawar has to curtail his chief ministerial ambitions, he messaged it to his supporters
मात्र, मुख्यमंत्री बदलाची ही चर्चा भाजप श्रेष्ठींना फारशी रूचली नाही आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांना इशारा देऊन टाकला. त्यामुळे अजितदादांना लगेच ॲक्शन मोडवर यावे लागले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच अनिल पाटील, अमोल मिटकरी आणि धर्मराव बाबा आत्राम यांना चांगले झापले. इथून पुढे महाराष्ट्रात आपल्या गोटातून मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुढे येता कामा नये, असा गंभीर इशारा अजितदादांनी या निमित्ताने आपल्या समर्थकांना दिला.
अजितदादांना वर्तणुकीत फरक करावा लागला
अजितदादांच्या राजकीय वर्तणुकीत हा फार मोठा फरक दिसला आहे. अजितदादा आत्तापर्यंत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांची विशिष्ट दादागिरी चालायची. पण त्यांच्या यावेळच्या उपमुख्यमंत्री पदात मोठा फरक आहे, तो म्हणजे आधीच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणजे क्रमांक दोनचे नेते असायचे. आता ते क्रमांक तीनचे नेते झाले आहेत आणि त्यांचे “पॉलिटिकल डील” कमकुवत काँग्रेस बरोबर उरलेले नाही, तर बलाढ्य भाजपबरोबर त्यांचे “पॉलिटिकल डील” झाले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना ते काँग्रेस बरोबर करत असलेली मनमानी भाजपबरोबर करून चालणार नाही. मोदी – शहांचा भाजप असल्या गोष्टी ऐकून घेत नाही.
त्यामुळे मोदी – शाहांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांना इशारा मिळेल, अशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी तर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटला मराठीतून उत्तर देत त्यांचे कौतुक केले. याचा पुरेसा “पॉलिटिकल मेसेज” अजितदादा पर्यंत पोहोचला आणि अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच मुख्यमंत्री बदलाची चर्चा थांबवा,अशा स्पष्ट शब्दांत आपल्या समर्थक नेत्यांना सुनावले. किंबहुना त्यांना तसेच सुनवावे लागले.
अजितदादांमध्ये दिसलेला हा ठळक बदल आहे. मोदी – शाहांच्या बलाढ्य भाजपबरोबर “पॉलिटिकल डील” केल्यामुळे त्यांना तो करावा लागला आहे.
Ajit pawar has to curtail his chief ministerial ambitions, he messaged it to his supporters
महत्वाच्या बातम्या
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!