नाशिक : पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.
पण ती करताना अजित पवारांना नवी माणसे सापडली नाहीत. त्यामुळे पुणे पूर्व विभागाच्या अध्यक्षपदी वडगाव शेरीतील राष्ट्रवादीचे पडेल उमेदवार सुनील टिंगरे यांची नियुक्ती करावी लागली, तर पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदावर सुभाष जगताप यांची नियुक्ती केली. दोघांकडे प्रत्येकी चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली. अजितदादांनी जुन्याच भाकऱ्या उलटवून तव्यावर टाकल्या.Ajit Pawar has few options in Pune therefore he gave walk over to BJP
दीपक मानकर यांच्यावर राज्य सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला, पण पोर्शे कार प्रकरणात अडकलेल्या सुनील टिंगरे यांच्याशिवाय अजितदादांना दुसरा पर्याय सापडला नाही. पोर्शे कार प्रकरणात बडी धेंडे अडकल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी सुनील टिंगरे यांनी प्रयत्न केले होते.
त्यावरून पुण्या बरोबरच राज्यात बरीच खळबळ माजली होती. अजितदादांच्या राष्ट्रवादीला सगळीकडून टीकेचा भडीमार सहन करावा लागला होता, तरी देखील अजितदादांनी विधानसभेच्या निवडणुकीत वडगाव शेरीतून सुनील टिंगरे यांचीच उमेदवारी रिपीट केली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारे यांनी सुनील टिंगरे यांना आस्मान दाखविले. त्यामुळे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीतले पडेल उमेदवार ठरले.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अमुलाग्र बदल करण्याची संधी अजित दादांना मिळाली होती. पण अजित पवारांपुढे पर्याय मात्र फार राहिले नाहीत म्हणून त्यांना जुनेच नेते नव्या पदांवर नियुक्त करावे लागले. संपूर्ण पुणे शहरासाठी एकच शहराध्यक्ष अजून तरी मिळाला नसल्याने त्यांनी 2 शहराध्यक्ष नेमले. त्याशिवाय आणखी 4 कार्याध्यक्ष नेमणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. याचा अर्थ अजित पवार आता उरल्या-सुरल्या राष्ट्रवादीत अधिकाराची वाटणी करून महापालिका निवडणुकीला सामोरे जायचा प्रयत्न करणार आहेत. यातले between the lines असे की अजितदादांनी भाजपला walk over दिला आहे.
कारण सध्या भाजपच्या मोठ्या ताकदीमुळे काँग्रेसची पुण्यातली ताकद खूपच कमी झाली आहे. काँग्रेसकडे आता म्हणावेत असे नेतेच उरलेले नाहीत. काँग्रेसकडे आमदार, खासदार नाहीत, पण संघटनाही कमकुवत झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपशी टक्कर घेण्याची थोडीफार संधी अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होती. पण राष्ट्रवादीतच मोठा गडबड घोटाळा झाल्याने तो पक्ष बॅकफूटवर आला. पुण्यात संघटना वाढवण्यासाठी अजित पवारांना पुरेसा प्रबळ पर्याय न सापडल्याने राष्ट्रवादीतल्या जुन्याच भाकऱ्या तव्यावर टाकाव्या लागल्या. त्यामुळे संपूर्ण पुणे शहर व्यापून भाजप समोर उभा राहणारा पक्षच शहरात उरला नाही. म्हणून भाजपला परस्पर walk over मिळाला.
Ajit Pawar has few options in Pune therefore he gave walk over to BJP
महत्वाच्या बातम्या
- Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा
- Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!
- PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!
- Shubanshu Shukla : भारत अवकाशात इतिहास रचणार! शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकावर होणार रवाना